Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ICC World Cup : महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्ह्जवरून पेटलेला वाद अखेर असा मिटला !!

Spread the love

भारतीय टीमचा  कर्णधार राहिलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्ह्जवरून चांगलाच वाद पेटला होता . आयसीसीने आक्षेप घेतल्यानंतर धोनीने ग्लोव्ह्ज वापरणारच असा पवित्रा घेतला होता. पंरतु, आता बीसीसीआयने या प्रकरणावर पडदा टाकला आहे. या प्रकरणी बीसीसीआयने आयसीसीला उत्तर दिलं आहे. पैरा स्पेशल फोर्सचं चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज धोनीला वापरता येणार नाही, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे धोनीला पुढील सामन्यात हे ग्लोव्ह्ज काढून ठेवावे लागणार आहे.

भारतानं ICC World Cupमध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवत मिशन वर्ल्डकपला सुरुवात केली आहे. दरम्यान या सामन्यात रोहित शर्मानं शतकी खेळी करत सर्वांचे मन जिंकले, पण चर्चा झाली ती धोनीच्या ग्लोव्ह्जची. भारताच्या गोलंदाजी दरम्यान यष्टीरक्षण करताना धोनीच्या ग्लोव्ह्जवर एक खास चिन्ह दिसून आले. हे चिन्ह होते, पैरा स्पेशल फोर्स या चिन्हाला बलिदान चिन्हही म्हटले जाते. क्रिकेटच्या इतिहासात असा प्रकार कधीच घडला नाही, की कोणत्या खेळाडूनं लष्काराचे चिन्ह सामन्या दरम्यान वापरले असेल. दरम्यान, पॅरा कमांडोजच्या सदस्यांना हे चिन्ह वापरण्याची परवानगी मिळते.

दरम्यान, २०११ मध्ये महेंद्रसिंह धोनीला भारतीय लष्करातर्फे मानाची लेफ्टनंट कर्नल ही पदवी बहाल करण्यात आली होती. धोनीने यासोबत पॅराट्रूपिंगचंही प्रशिक्षण घेतलं आहे. धोनी हा भारतीय सैनाच्या १०६ पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य आहे. तर, २०१५ साली प्रशिक्षण घेऊन धोनी पारंगत पॅराट्रूपर बनला होता. म्हणूनच या सामन्यात धोनी हे चिन्ह परिधानकरुन मैदानात उतरला. एवढेच नाही तर, धोनीच्या किटबॅगचा रंगही लष्कराचा आहे. मात्र आयसीसीला धोनीनं लष्कराच्या रंगाचा किटबॅट वापरण्यावर आक्षेप नाही. मात्र ग्लोव्ह्जवरुन आयसीसीनं बीसीसीआय आणि धोनीला फैलावर घेतले आहे.

या सगळ्या प्रकरणावर आयसीसीनं आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळाडू जे पेहराव परीधान करताता किंवा जी उपकरण वापरतात त्याबाबत काही नियम आहेत. पेहराव आणि उपकरणांवर राजकीय किंवा धार्मिक गोष्टी असू नयेत, असे आम्हाला वाटते. याबाबत आम्ही बीसीसीआयला विनंती केली होती.

या सर्व प्रकरणावर बीसीसीआयनं आयसीसीला आधी स्पष्टीकरण देऊन धोनीची बाजू घेतली होती. ‘धोनीच्या बलिदान या ग्लोव्ह्जमागे कोणताही राजकीय किंवा धार्मिक हेतू नव्हता. त्यामुळं आता धोनीनं हे ग्लोव्ह्ज वापरायचे की नाही, याच अंतिम निर्णय आयसीसीकडे असणार आहे. BCCI प्रशासक विनोद राय यांनी ANIला दिलेल्या प्रतिक्रियेत, “आम्ही यासंदर्भात आयसीसीकडे परवानगी मागितली असून प्रशासकीय समितीच्या बैठकीनंतर याबाबत सविस्तर माहिती देऊ”, असंही त्यांनी सांगितलं. अखेर शुक्रवारी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे बैठक पार पडली. या बैठकीत धोनीने ग्लोव्ह्ज वापरू नये, यावर शिक्कामोर्तब झालं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!