Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राहुल गांधी आपल्या भूमिकेवर ठाम , आज सायंकाळी पुन्हा बैठक

Spread the love

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम असून गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष करावा या मतावर राहुल गांधी ठाम आहेत त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकारी समितीने राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळल्यानंतरही राहुल गांधी राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असल्याची माहिती आहे. दरम्यान राहुल गांधी यांच्या निवासस्थानी हालचालींना वेग आला आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, प्रियंका गांधी वड्रा, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला आणि सचिन पायलट राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचले असून त्यांची चर्चा सुरु आहे. काही अटींवर राहुल गांधी राजीनाम्याच्या निर्णयावरुन माघार घेऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे. राहुल गांधी यांनी आज संध्याकाळी आपल्या निवासस्थानी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे.

राहुल यांनी पदावर कायम रहावे अशी माझी आहे पण ते त्यांचा निर्णय बदलणार नाहीत असे काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे सदस्य तरुण गोगोई यांनी सांगितले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर राहुल गांधी नाराज आहेत. वरिष्ठ नेत्यांनी जास्त मेहनत घ्यायला पाहिजे होती पण त्यांनी अपेक्षेनुसार काम केले नाही अशी राहुल गांधी यांची भावना आहे असे गोगोई यांनी सांगितले.

राहुल यांनी शनिवारनंतर कोणत्याही राजकीय कार्यक्रमास हजेरी लावलेली नाही. ते काँग्रेसच्या नव्या खासदारांनादेखील भेटलेले नाहीत. या निवडणुकीत फार थोडय़ा जागांमध्ये वाढ झाली असली, तरी १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पक्षाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. त्यामुळे देशातील या सर्वात जुन्या पक्षाची सूत्रे आता गांधी घराण्याबाहेरील नेत्याच्या हाती दिली जावीत, अशी ठाम भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी शनिवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत पक्षाच्या नेत्यांनी राहुल यांचा प्रस्ताव एकमताने फेटाळला असला तरी गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीनेच पक्षाध्यक्षपद सांभाळावे, या मतापासून राहुल यांना परावृत्त करण्यात काँग्रेस नेत्यांना यश आलेले नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!