Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

‘एक्झिट पोल’च्या या गॉसिपवर माझा विश्वास नाही’ : ममता बॅनर्जी

Spread the love

मतदानोत्तर एक्झिट पोलमध्ये केंद्रात पुन्हा एकदा स्पष्ट बहुमतासह एनडीए सरकार विराजमान होणार, असा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. ‘एक्झिट पोल’च्या या गॉसिपवर माझा विश्वास नाही, अशी तिखट प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे.
एक्झिट पोलच्या गॉसिपआडून हजारो ईव्हीएमध्ये फेरफार करण्याचे कारस्थान रचले जात आहे. म्हणूनच सर्व विरोधी पक्षांनी एकजूट दाखवण्याची गरज आहे. पूर्ण ताकदीनिशी आणि आक्रमकपणे या सर्वाला तोंड देण्याची गरज आहे, असे आवाहन ममतांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे. एक्झिट पोलचे निकाल कसे गडगडले आहेत, याचा इतिहास आपणा सगळ्यांनाच माहीत आहे, असे नमूद करतानाच भारतीय मतदार सजग आहे आणि त्याची ‘मन की बात’ कोणताच एक्झिट पोल हेरू शकत नाही, असा टोलाही ममतांनी लगावला.

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनीही एक्झिट पोलवरून टोला लगावला आहे. सगळेच एक्झिट पोल खोटे असू शकणार नाहीत! त्यामुळे टीव्ही बंद करण्याची व सोशल मीडियातून लॉगआउट होण्याची वेळ आली आहे. आता एवढंच पाहायचंय की २३ तारखेला निकाल लागल्यानंतर पृथ्वी आपल्याच कक्षेत फिरणार की नाही, हे पाहायचंय, असे उपरोधिक ट्विट उमर अब्दुल्ला यांनी केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!