Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Exit Poll : महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेला ३७ जागा, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ११ जागा

Spread the love

लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ मे रोजी लागणार असले तरी एक्झिट पोलचे चित्र स्पष्ट झाले असून महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचा वरचष्मा कायम राहताना दिसत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी गेल्यावेळेपेक्षा किंचित सुधारणार असाही अंदाज आहे. टाइम्स नाऊ-व्हीएमआरच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला ३७ जागा मिळण्याची शक्यता असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ११ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला ४२ जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेस आघाडीला ६ जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस आघाडीच्या ५ जागा वाढून ११ जागांपर्यंत आघाडी मजल मारणार असून भाजप-शिवसेनेला ५ २०१४मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीने ३४.१ टक्के तर भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीने ५१.३ टक्के मते मिळवली होती. अन्य पक्षांच्या पदरात १४.६ टक्के मते गेली होती. आताचे एक्झिट पोल पाहता भाजप आघाडीचा मतटक्का २.७ ने घटून ४८.६ टक्क्यांवर येईल तर काँग्रेस आघाडीला ३६.५ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. अन्य पक्षांना १४.९ टक्के मतदान होऊ शकतं.
उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक ४८ जागा महाराष्ट्रात असून राज्यात ४ टप्प्यांत मतदान झाले होते. राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्ध जोरदार प्रचार मोहीम राबवली. प्रमुख महानगरांमध्ये जाहीर सभा घेत राज यांनी रान उठवले. त्याचा तितकासा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होईल, असे या सर्वेक्षांमधून मात्र दिसत नाही.

दरम्यान, राज्यात यावर्षीच विधानसभेच्या निवडणुका होत असून लोकसभेचे निकाल त्यादृष्टीने फारच महत्त्वाचे ठरणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!