Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जातीभेदातून पदावनाती केल्याने महिलेची न्यायालयात धाव, चौकशी करण्याचे निर्देश

Spread the love

जातीवरून भेदभाव करण्यात आला असून जाणीवपूर्वक कनिष्ठ पदावर अचानक बदली करण्यात आली असल्याचा आरोप करत अणुऊर्जा विभागात कर्मचारी असलेल्या एका महिलेने लेखी तक्रार केली असून यासंदर्भात चौकशी करण्याचे निर्देश मुंबईच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने नुकतेच पोलिसांना दिले आहेत.

या विषयाची अधिक माहिती अशी कि, नीलिमा कदम (५२) यांनी याविषयी न्यायालयात अर्ज केला होता. ‘मी या १९८८ मध्ये या विभागात स्टेनोग्राफर म्हणून नोकरीस लागले. मागील १०-१२ वर्षांपासून प्रसिद्धीपत्रके, जनसुनावणी, प्रदर्शने अशा विविध कामांची जबाबदारी मी सांभाळत होते. सप्टेंबर-२०१६मध्ये मला स्वीय सहायकपदी बढती देण्यात आली. मात्र, जनसंज्ञापनची पदवीधारक असल्याने मला प्रसारमाध्यमांशी संबंधित पदावरील कामाची जबाबदारी द्यावी, अशी विनंती मी केली होती. मात्र, हा विषय अणुऊर्जा विभागाचे अध्यक्ष व सचिवांपर्यंत गेल्यानंतर जुलै-२०१७मध्ये माझी अचानक स्टेनोग्राफर-२ या कनिष्ठ पदावर पदावनती करून भाभा अणुसंशोधन केंद्रात बदली करण्यात आली. यासंदर्भात माहितीच्या अधिकारात माहिती मिळवल्यानंतर माझी अचानक व कोणत्याही कारणाविना बदली करण्यात आल्याचे उघड झाले. मी अनुसूचित जातीची असल्याने मला जाणीवपूर्वक भेदभावपूर्वक वागणूक देत आणि कुहेतूने पदावनती करत माझी बदली करण्यात आली’, असे नीलिमा यांनी तक्रारीत म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!