Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शरद पवार यांनी उद्ध्वस्त राज ठाकरेंचे ‘इंजिन’ भाड्याने घेतले असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका

Spread the love

मनसे नेते राज ठाकरे यांच्या घणाघाती आरोपांना आणि आक्रमक प्रचाराला अंगावर घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्ला बोल केला . ते म्हणाले कि , नोटबंदीच्या निर्णयामुळे राज ठाकरे यांचे दुकान उद्ध्वस्त झाल्याने त्यांना मोदीद्वेषाने पछाडले आहे,  आगे आगे देखो, होता है क्या ? नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता असताना राज्य व केंद्रात भाजपाचे सरकार होते, याचा विसर त्यांना पडला. या सरकारने त्यांच्या विनंतीवरून पैसा पुरविला, त्यामुळे मनसेचे इंजिन नाशकात सुरळीत चालू शकले, असा खुलासाही फडणवीस यांनी सभेत बोलताना केला.

लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रचारतोफा शनिवारी सायंकाळी पाच वाजता थंडावणार आहे. तत्पुर्वी नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शरद पवार, छगन भुजबळ यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे व आघाडी सरकारवर फडणवीस यांनी आपली अखेरच्या सभेतून तोफ डागली. राज ठाकरे यांनी याच मैदानावर शुक्रवारी रात्री सभा घेऊन भाजपा सरकार व दत्तक पिता देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला होता . मनसे काळात नाशिक शहरात झालेल्या विकासकामांची ‘झलक’ व्हिडिओतून दाखविली. त्यांचे दावे खोडताना शनिवारी सकाळी फडणवीस यांनी बोलताना सांगितले, राज ठाकरे यांच्या मनसेची महापालिकेत सत्ता होती, तेव्हा राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार होते, या सरकारने मनपाला पैसा पुरविला म्हणून मनसेचे इंजिन सुरळीत चालू शकले आणि विकासकामे त्यांना करता आली; मात्र त्याचे सर्व श्रेय ठाकरे आता घेत आहेत. राहिला प्रश्न नाशिकच्या विकासाचा तर नाशिकमध्ये ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत सध्या २ हजार कोटींची कामे सुरू आहेत; मात्र मोदीद्वेषाने डोळ्यांवर झापडे पडल्यामुळे ठाकरे यांना ती विकासकामे दिसणार नाहीत. जशी सायकल, मोटारसायकल भाडे तत्वावर मिळते, अगदी तसेच शरद पवार यांनी राज ठाकरेंचे ‘इंजिन’ भाड्याने घेतले असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!