Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्याचा भाजपचा प्रयत्न फारसा प्रभावी नाही , अनेक प्रश्नांवर भाजप निरुत्तर !!

Spread the love

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभर प्रचारसभांचा धडाका लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक आरोप केले होते. मोदींची जुनी भाषणे , जाहीरातीचे व्हिडिओ दाखवून भाजपाच्या दाव्यांची पोलखोल केली होती. या सर्व टीकेला भाजपाने आज बांद्र्याच्या  रंगशारदा सभागृहामध्ये ‘बघाच तो व्हिडिओ’ च्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्नआशिष शेलार यांनी केला.त्यांचा हा प्रयत्न म्हणजे खोटे बोला पण रेटून बोला असाच होता हेच या प्रयत्नातून जाणवले.

शेलार म्हणाले कि , जे चुकतंय त्यावर टीका व्हायलाच हवी. त्यामुळे टीकेला विरोध करायचं कारण नाही. आजची सभा हा प्रतिहल्ला किंवा प्रतिशोध नाही. पलटवार किंवा व्यक्तिगत आरोपही आम्ही करणार नाही. केवळ सत्य जनतेसमोर मांडण्यासाठी ही सभा असल्याचं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं. कुठलेही ठोस पुरावे नसताना, माहितीची खातरजमा न करता, भाषणं तोडून-मोडून दाखवत राज यांनी मोदी सरकारवर आरोप केल्याचं त्यांनी नमूद केलं आणि ‘मित्रा तू खरंच चुकलास’, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

मनसेच्या स्थापनेवेळी जे राज यांच्यासोबत होते, त्यांच्यापैकी अनेक शिलेदारांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यावरूनही भाजपाने राज यांना लक्ष्य केलं. शिशीर शिंदे, वसंत गीते, प्रवीण दरेकर, श्वेता परुळेकर, अतुल चांडक, दगंबर कांडरकर, दीपक पायगुडे, शिरीष पारकर यांच्यापैकी कुणीही राज ठाकरेंसोबत राहिलेले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

यावेळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरेंनी केलेले आरोप कसे अर्धवट, अर्धसत्यावर आधारीत आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आशिष शेलार आणि राज ठाकरे हे व्यक्तिगत जीवनात परस्परांचे चांगले मित्र आहेत. राजकारणापलीकडे असणारी त्यांची मैत्री सर्वांनाच माहित आहे. आशिष शेलारांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली तरी अनेकदा ते कृष्णकुंजवर राज ठाकरेंना भेटायला जात असतात. राज ठाकरेंनी या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. आपल्या प्रचारसभांमधून ते भाजपा-शिवसेनेच्या उमेदवारांना पराभूत करण्याचे आवाहन करत आहेत. तोच धागा पडकडून आशिष शेलार यांनी ‘मित्रा तू खरंच’ चुकलास असे भावनिक उदगार काढले.

आशिष शेलार यांच्या या खुलाश्यामुळे त्यांचे भक्त खुश होऊ शकतात पण जनतेच्या मात्र हा खुलासा पचनी पडणारा नाही असेच म्हणावे लागेल. राज ठाकरे यांच्या आरोपांची उत्तरे देण्याचा प्रयत्न विनोद तावडे यांनीही सातत्याने केला आहे परंतु राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या एकही प्रश्नाचे उत्तर भाजप देऊ शकत नाही.

https://www.facebook.com/tawdevinod/videos/419352765527971/?t=0

आपलं सरकार

Click to listen highlighted text!