Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha 2019 : लोकसभेच्या एकूण ५४५ जागांपैकी आतापर्यंत ३०२ जागांवर पार पडले मतदान, सर्वात कमी मतदान जम्मू काश्मीरमध्ये !!

Spread the love

देशभरातील मतदानाची टक्केवारी

>> महाराष्ट्र : ५५.०५ टक्के 
>> आसाम : ७४.०५ टक्के 
>> बिहार : ५४.९५ टक्के 
>> छत्तीसगड : ६४.०३ टक्के 
>> दादरा व नगर हवेली : ७१.४३ टक्के 
>> दमण व दीव : ६५.३४ टक्के 
>> गोवा : ७०.९६ टक्के 
>> गुजरात : ५८.८१ टक्के 
>> जम्मू-काश्मीर : १२.४६ टक्के 
>> कर्नाटका : ६०.८७ टक्के 
>> केरळ : ६८.६२ टक्के 
>> ओडिशा : ५७.८४ टक्के 
>> त्रिपुरा : ७१.१३ टक्के 
>> उत्तर प्रदेश : ५६.३६ टक्के 
>> पश्चिम बंगाल : ७९ 

देशातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रासह १५ राज्यात किरकोळ अपवाद वगळता मतदानशांततेत पार पडलं. १५ राज्यातील ११७ जागांवर सरासरी ६४.६६ टक्के मतदान झालं. तर महाराष्ट्रात ५५.०५ टक्के मतदान झालं. देशात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७९ टक्के तर जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात कमी १२.४६ टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे . लोकसभेच्या एकूण ५४५ जागांपैकी आतापर्यंत ३०२ जागांवर मतदान पार पडलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ९१ जागांवर ६९. ५ टक्के मतदान झालं होतं. दुसऱ्या टप्प्यात ९५ जागांवर ६९.४४ टक्के मतदान झालं होतं. तर तिसऱ्या टप्प्यात ११७ जागांवर ६४.६६ टक्के मतदान झालं आहे.

आजच्या मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सपा नेते अखिलेश यादव, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांच्यासह अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला. कडक उन्हामुळे मतदारांनी सकाळच्या वेळेत आणि दुपारनंतर शेवटच्या दोन तासात मतदान केंद्रांवर रांगा लावून मतदान केलं. या मध्ये नवीन मतदार आणि महिलांनी अधिक उत्साहाने मतदान केले . आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे गुजरातमध्ये गीरच्या जंगलात केवळ एका मतदारासाठी मतदान केंद्र बनिवण्यात आलं होतं. भारतदास बापू असं या मतदाराचं नाव असून त्याने मतदानात भाग घेऊन मतदानाचा हक्क बजावल्याने या मतदान केंद्रावर १००% मतदानाची नोंद झाली.

हिंसाचाराच्या घटना

दरम्यान पश्चिम बंगालच्या मुर्शीदाबादमधील राणीनगर मतदान केंद्राजवळ अनोळखी व्यक्तींनी आज गावठी बॉम्बचा स्फोट घडवून आणला. यात तृणमूल काँग्रेसचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. या स्फोटानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान केंद्र बंद केलं होतं. त्याच बरोबर याच शहरातील बलिग्राममधील मतदान केंद्राबाहेर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यात मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका मतदाराचा मृत्यू झाला आहे.

आज जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात कमी १२.४६ टक्के मतदान झालं . जम्मू-काश्मीरच्या बिजबेहर येथे मतदान सुरू असताना पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकर्ते आपआपसात भिडले. बोगस मतदान करणाऱ्यांना रोखलं म्हणून पीडीपीच्या कार्यकर्त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या पोलिंग एजंटला बेदम मारहाण केली. मात्र हा पोलिंग एजंट महिलांशी असभ्यपणे वागल्यानेच आम्ही त्याला मारहाण केली, असं पीडीपीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.

गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होम पीच असलेल्या  सर्वच्या सर्व २६ तर केरळमध्ये २० जागांवर आज  मतदान झालं. मोदींनी गांधीनगरमध्ये मतदान केलं. गुजरातमध्ये सरासरी ५८.८१ टक्के तर केरळात ६८.६२ टक्के मतदान झालं. गुजरातमध्ये गांधीनगर येथून भाजपचे अध्यक्ष अमित शहा तर केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी उभे आहेत. याशिवाय भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले, स्वाभिमानीचे राजू शेट्टी, समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंह यादव, भाजपचे वरुण गांधी, भाजप नेत्या जयाप्रदा आदींचे भवितव्य मतपेटीत बंद झालं असून येत्या २३ मे रोजी निकाल लागणार आहे.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!