Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha 2019 : हार्दिक पटेल यांची लोकसभेची संधी तर गेली …

Spread the love

काँग्रेस नेते हार्दिक पटेलला लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही  हे आता स्पष्ट झाले आहे . मेहसाना दंगलप्रकरणी हार्दिकला सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आज लोकसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी हार्दिकला निवडणूक अर्ज दाखल करता आला नसल्याने यंदा निवडणूक लढवण्याची त्याची संधी २०१५ रोजी झालेल्या मेहसाना दंगलप्रकरणी हार्दिक पटेलला दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

या शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्याला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याने लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१च्या तरतुदीनुसार निवडणूक लढण्यास तो अपात्र ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती मिळवून घेण्याचा हार्दिकचा प्रयत्न होता. लोकसभा निवडणूक लढवायची असल्याने शिक्षेला स्थगिती देण्यात यावी, अशी विनंती त्याने कोर्टाला केली होती. मात्र कोर्टाने दिलासा न दिल्याने हार्दिकची कोंडी झाली आहे.

भाजप आमदाराच्या कार्यालयात हार्दिक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी धुडगूस घातला होता. गुजरात उच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं होतं. हार्दिक पटेल आणि त्याच्या दोन्ही साथीदारांना प्रत्येकी दोन वर्षाची शिक्षा आणि ५०-५० हजाराचा दंड ठोठावण्यात आला होता. परिणामी हार्दिक पटेल यांची लोकसभेची संधी हुकली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!