Loksabha 2019 : निकालाविषयीच्या २२ प्रश्र्नांची अचूक उत्तरे द्या आणि मिळावा २१ लाखांचे बक्षीस !!

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता जोरात सुरू झालाय.सगळेच राजकिय पक्ष एकमेकांवर चांगलंच तोंडसुख घेत आहेत. प्रत्येक पक्ष आपल्या विजयाचा अंदाजही व्यक्त करतो. मात्र या पक्षांनी केलेल्या दाव्याला अनेकांचे अंदाज खतपाणीही घालताय. त्यांतच ज्योतिषांनी केलेल्या निकालाच्या दाव्यांनी रंगत आणखी वाढली आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या सर्वच दाव्यांना थेट आव्हान दिलंय.आता अचूक अंदाज व्यक्त करणाऱ्या या ज्योतिष्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आव्हान दिलंय. अंनिसनं बँकेत 21 लाख फिक्स डिपॉझिट ठेवले असून 25 प्रश्न जाहीर केले आहेत. यातील 22 प्रश्नांचा अचूक अंदाज देणाऱ्या ज्योतिष्याला हे 21 लाख दिले जाणार आहेत.