Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मी दुसऱ्यांशी स्पर्धा करीत नाही , माझ्या नादाला लागू नका : सुप्रिया सुळे

Spread the love

‘शेतकरी, सर्वसामान्य, नोकरदार, तरुण यांची फसवणूक करणारे हे सरकार आहे. नोटाबंदी, कर्जमाफी यामध्ये अनेकजण भरडले गेले आहेत. ही निवडणूक म्हणजे सत्य-असत्याची लढाई आहे. त्यांच्या डोळ्यात माझा सेल्फी खुपतो. काही चुकत असेल, तर सांगा. परंतु, वरिष्ठांवर टीका करू नका. महिला मूळातच खूप संयमी असतात. परंतु, अति झाले, तर ती पदर खोचून झाशीचा अवतार धारण करते. तेव्हा कुणी माझ्या नादी लागू नये,’ असा इशारा बारामती लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेयांनी दिला.

भोर येथील वेताळपेठेत मतदारांशी संवाद साधताना सुळे बोलत होत्या. या वेळी जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतारे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, भालचंद्र जगताप, नितीन धारणे, पंचायत समिती सदस्य दमयंती जाधव आदी उपस्थित होते. सुळे म्हणाल्या, ‘बारामती मतदारसंघाचे नेतृत्व शरद पवारांनी केले आहे. त्या जबाबदारीचे भान ठेवून गेली दहा वर्षे मी वाटचाल करीत आहे. मी दुसऱ्यांशी स्पर्धा करीत नाही. सातत्याने स्वतःशी स्पर्धा करीत असल्यामुळे मला काम करण्याची संधी मिळते. गेल्या पाच वर्षांत संसदेमध्ये सर्वांत जास्त प्रश्न विचारण्याचा मान बारामतीला मिळाला आहे. सत्तेमध्ये नसतानाही मतदारसंघात अनेक कामे केली आहेत.’

आपलं सरकार

Click to listen highlighted text!