Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Parbhani : पाण्याच्या वादातून परभणीत शिवसेना नगरसेवकाची दगडाने ठेचून हत्या

Advertisements
Advertisements
Spread the love

परभणीतील जायकवाडी वसाहत परिसरात किरकोळ कारणावरून शिवसेनेच्या नगरसेवकाची दगडाने ठेचून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमरदीप रोडे असे या नगरसेवकाचे नाव आहे. या हत्येनंतर आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

रवी गायकवाड आणि किरण ढाके अशी आरोपींची नावे असून हे दोघे रोडे यांचे सहकारी आहेत. किरकोळ वादातून त्यांनी नगरसेवकाची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रोडे, गायकवाड आणि ढाके यांच्यात पाण्यावरून वाद झाल्याचे सांगितले जात आहे. काही महिलांनी रोडे यांना पाण्याचा वाद सोडण्यासाठी फोन करून बोलावले. त्यावेळी रवी गायकवाड, किरण ढाके आणि नगरसेवक रोडे यांच्यात वाद निर्माण झाला. याचे पर्यवसन हाणामारीत झाले. भांडण विकोपाला गेल्यानंतर गायकवाड आणि ढाके यांनी दगडाने ठेचून नगरसेवक रोडे यांची हत्या केली.
या घटनेनंतर जायकवाडी परिसरात लोकांचा मोठा जमाव जमला आहे. शिवाय शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, नगरसेवक अमरदीप यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!