Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अर्धसैनिक दलांच्या भत्यांमध्ये केंद्राची वाढ

Spread the love

पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र सरकारने अर्ध सैनिक दलांच्या जवानांना एक मोठी भेट दिली आहे. गृह मंत्रालयाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विविध भत्यांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे पुलवामा हल्ल्यानंतर माध्यमांनी या जवानांच्या अर्थिक स्थितीकडे लक्ष वेधण्याच्या प्रयत्नाला यश आले आहे.गृह मंत्रालयाने रविवारी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील निरिक्षक आणि त्यावरील पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या रिस्क आणि हार्डशिप भत्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा केली. या घोषणेनुसार, सीएपीएफच्या निरिक्षकाचा भत्ता आता ९,७०० रुपयांची वाढून तो १७,३०० रुपये प्रती महिना करण्यात आला आहे. तर अधिकाऱ्यांना मिळणारा भत्ता १६,९०० रुपयांवरुन २५,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. यामध्ये काश्मीरच्या ११ जिल्ह्यांमध्ये आणि नक्षलप्रभावित ८ जिल्ह्यांमध्ये तैनात अर्ध सैनिक दलांचा समावेश असेल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!