कुलगाम: चकमकीत तीन दहशतवादी ठार , डीएसपी अमन शहीद
Advertisements
Advertisements
दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात तारिगाम येथे रविवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या भागात २ ते ३ अतिरेकी लपले असण्याची खबर सुरक्षा दलाला मिळाली होती. तीन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाने खात्मा केला. तर डीएसपी अमन ठाकूर या चकमकीत शहीद झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दहशतवादी तारिगाम भागात लपले असल्याची खबर सैन्याला मिळताच या क्षेत्राला घेराव घालण्यात आला. सुरक्षा दलाची शोधमोहिम सुरू होती. तेवढ्यात दहशतवाद्यांनी गोळीबारास सुरूवात केली. त्याला सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे .
Advertisements
