Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पोलीस बंदोबस्तात आर्चीची परीक्षा : बघ्यांची गर्दी !!

Advertisements
Advertisements
Spread the love

मराठी सिनेसृष्टीत ‘सैराट’ चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू ही टेंभूर्णी येथील एका परीक्षा केंद्रातून बारावीची परीक्षा देत आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी सकाळपासूनच चाहत्यांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती. तिची लोकप्रियता आणि तिला पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता महाविद्यालयाने पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली होती. ती जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून परीक्षा देत आहे. तिला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होईल हे ठाऊक असल्यामुळे कॉलेजच्या प्राचार्या जयश्री गवळी-सातपुते यांनी टेंभूर्णी पोलीस ठाण्यात पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली होती.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!