Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

रवीना टंडन उचलणार शहीद जवानांच्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च

Advertisements
Advertisements
Spread the love

पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिनं शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्णय घेतलाय. या जवानांच्या मुलींचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय तिनं घेतला आहे.
शहिदांच्या कुटुंबाकरिता मदतनिधी गोळा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या नवी दिल्लीतील रोटरी क्लबच्या कार्यक्रमात रवीना टंडनने हे जाहीर केले. याविषयी रवीना सांगते, ‘देशासाठी प्राण गमावलेल्या आपल्या जवानांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी लोकांनी पुढे यावे यासाठी मी आवाहन करत आहे. त्यांना खरेच आपल्या मदतीची गरज आहे. कमी असो वा जास्त कुठल्याही प्रकारे केलेली मदत कायम महत्त्वाची ठरते.’ पुलवामा हल्ल्यानंतर अनेक बॉलिवूडकरांनी पुढे येत मदतनिधी गोळा केला. अमिताभ बच्चन यांनी शहिदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत केली तर अक्षय कुमारनंही लोकनिधीतून ७ कोटी उभे केले. याशिवाय अनेक कलाकार आर्थिक मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!