Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

प्रियंकास्त्र : भाजपपेक्षा सपा-बसपाला अधिक फटका

Spread the love

काँग्रेसचा मतटक्का मात्र वाढणार

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच प्रियांका गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्याने ‘प्रियांका फॅक्टर’ काँग्रेससाठी किती लाभदायी ठरतो, याबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असताना एका सर्वेक्षणात प्रियांकांमुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मतटक्का वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशच्या पूर्व विभागाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी प्रियांका यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या भागात कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकून पक्षाची नव्याने बांधणी करण्याचे आव्हान प्रियांकांवर असून त्यात त्या काहीअंशी यशस्वी होतील, असे संकेत ताज्या सर्वेक्षणातून मिळत आहेत.

इंडिया टीव्ही-सीएनएक्सने पूर्वांचलमधील ४३ जागांवर हे सर्वेक्षण केले असून प्रियांकांमुळे या सर्वच मतदारसंघात काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढेल, असा अंदाज वर्तवला गेला आहे. काँग्रेसची मते वाढली तरी जागांच्या बाबतीत विशेष फायदा होणार नाही. काँग्रेसला या भागात ४ जागा मिळतील, असे हे सर्वेक्षण सांगते. ४३ पैकी २० जागा एनडीएला तर १९ जागा सपा-बसपा महागठबंधनला मिळतील, असा अंदाज आहे.

भाजपपेक्षा सपा-बसपाला अधिक फटका

प्रियांकांमुळे काँग्रेसच्या दोन जागा वाढणार आहेत. पूर्वांचलमध्ये अमेठी, रायबरेलीसह चार जागा काँग्रेस जिंकेल. काँग्रेसचा नंबर वन प्रतिस्पर्धी भाजप असला तरी प्रियांकांमुळे भाजपऐवजी सपा-बसपाच्या महागठबंधनला अधिक फटका बसेल. आधीच्या सर्वेक्षणात महागठबंधनला २६ जागा मिळतील, असा अंदाज होता. त्यात आता ७ जागांची घट होताना दिसत आहे, असे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. त्याचवेळी या सर्वेक्षणात एनडीएच्या ५ जागा वाढतील, अशी शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!