Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : ‘बाहुबली’ अतिक अहमदचा मुलगा असद चकमकीत ठार, शूटर गुलामही ठार

Spread the love

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील माफिया अतिक अहमदचा मुलगा असद अहमद पोलिसांच्या चकमकीत ठार झाला असल्याचे वृत्त आहे.  असद हा उमेश पाल हत्याकांडातील मुख्य आरोपी असून तो बऱ्याच दिवसांपासून फरार होता. उमेश पाल खून प्रकरणात असदचाच हात असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश हत्या प्रकरणात सहभागी असलेला गुलामही चकमकीत मारला गेला. असद आणि गुलाम या दोघांवर प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस होते. असद अहमदला चकमकीत मारल्याबद्दल उमेश पालची आई शांती देवी आणि पत्नी जया पाल यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत. असद आणि गुलाम परिचा धरणाजवळ लपले होते. 

आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास असद आणि गुलाम यांची चकमक झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही चकमक झाशीपासून 7 किमी अंतरावर असलेल्या यूपीच्या झाशीच्या बरका गावात परिछा धरणावर झाली. या चकमकीत 12 जणांचा सहभाग होता, ज्यामध्ये 2 डेप्युटी एसपी आणि 2 इन्स्पेक्टरही सहभागी झाले होते. पोलिसांनी 2 विदेशी पिस्तुलेही जप्त केली आहेत. या चकमकीत 40 राऊंड गोळीबार करण्यात आला.

एडीजी अमिताभ यश यांनी  सांगितले की, असद आणि गुलाम दोघांकडे नवीन सिमकार्ड आणि नवीन फोन होते. त्यांच्याकडे विदेशी शस्त्रेही सापडली आहेत. असद आणि गुलाम यांनी पोलिसांवर गोळीबार केला आणि प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. या दरम्यान दोघांचा मृत्यू झाला. असद झाशीहून मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, असे सांगण्यात येत आहे. हत्येनंतर असद लखनौला गेला. लखनौ ते कानपूर, मग तिथून मेरठ साधारण आठवडाभर. मेरठहून ते दिल्लीतील संगम विहार येथे गेले. तेथून पुन्हा यूपीला जाऊन झाशी शहरातून मोटारसायकलने मध्यप्रदेशला जात होते. यूपी एसटीएफ रात्रीपासून झाशीच्या अनेक भागात छापे टाकत आहे. अतिकच्या टोळीतील एका सदस्याने पोलिसांना याबाबत टीप दिली होती.

मुख्यमंत्री योगी यांच्याकडून कौतुक

यूपीच्या सीएमओने सांगितले की, असद आणि त्याच्या साथीदाराच्या एन्काउंटरनंतर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बैठक घेतली. सीएम योगी यांनी यूपी एसटीएफ तसेच डीजीपी, विशेष डीजी कायदा आणि सुव्यवस्था आणि संपूर्ण टीमचे कौतुक केले. प्रधान सचिव गृह संजय प्रसाद यांनी मुख्यमंत्र्यांना या चकमकीची माहिती दिली. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी असदच्या एन्काउंटरवर ट्विट करून यूपी एसटीएफचे अभिनंदन केले.

उमेश पाल खून प्रकरणात गुलामचाही सहभाग होता, जो या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजमध्ये टोपी घातलेला दिसत होता. गुलाम फरार होता. अतीक अहमद यांच्या कुटुंबाशी त्याचा दीर्घकाळ संबंध होता. तो मरियादीहचा रहिवासी होता, जिथे या टोळीने यापूर्वी अनेक खळबळजनक घटना घडवून आणल्या आहेत.

उमेश पाल हत्याकांडातील आरोपी अतिक अहमद याचा मुलगा असद याचा गेल्या अनेक दिवसांपासून यूपी पोलीस शोध घेत होते. गेल्या महिन्यात, यूपी एसटीएफच्या माहितीवरून, दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलच्या काउंटर इंटेलिजन्स युनिटने शस्त्रास्त्र कायद्याच्या प्रकरणात असदला मदत करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आणि त्यांना यूपी एसटीएफच्या ताब्यात दिले.

बातमी समजताच रडू लागला बाहुबली अतिक अहमद

असद चकमकीत ठार झाल्याची बातमी पसरली तेव्हा प्रयागराजमधील उमेश पाल खून खटल्यात अतिक अहमदला मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले जात होते. मुलाच्या एन्काऊंटरची बातमी आतिकला समजताच तो कोर्टात उभा असतानाच रडू लागला. यावेळी आतिकचा लहान भाऊ अफ्राफ हाही त्याच्यासोबत उभा होता. अतिक अहमद आणि अशरफ यांना मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

काय होते प्रकरण ?

बसपा आमदार राजू पाल यांच्या हत्या प्रकरणात प्रमुख साक्षीदार असलेल्या उमेश पाल आणि त्याच्या दोन सुरक्षा रक्षकांची 24 फेब्रुवारी रोजी धुमनगंज भागात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.उमेश पाल आणि त्यांच्या दोन सुरक्षा कर्मचार्‍यांची धुमनगंज पोलिस स्टेशन परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यांच्या मदतीने बहुतांश गोळीबार करणाऱ्यांची ओळख पटली आहे. उमेश पाल यांची पत्नी जया पाल यांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी धुमनगंज पोलिस ठाण्यात याप्रकरणी एफआयआर दाखल केला. या एफआयआरमध्ये माजी खासदार अतीक अहमद, त्याचा भाऊ अशरफ, पत्नी शाइस्ता परवीन, अतीकची दोन मुले, अतीकचे साथीदार गुड्डू मुस्लिम आणि गुलाम आणि इतर नऊ जणांना हल्ल्यासाठी दोषी ठरवण्यात आले आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी अनेक पथके तयार करून वेगाने कारवाई केली, त्याचे परिणामही समोर येत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!