Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुंबईतीत पुन्हा १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

Spread the love

मुंबईतील लोअर परेल परिसरात एका १५ वर्षीय मुलीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. संबंधित मुलीला तिचा मित्र त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला होता, जिथे सहा जणांनी मिळून मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेतील तीन आरोपी अल्पवयीन आहेत. या प्रकरणी एन एम जोशी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबईतील लोअर परेल परिसरात हि घटना घडली असून, या आरोपींपैकी एक अल्पवयीन मुलगा या मुलीच्या चांगल्या मित्रांपैकी एक आहे. २३ डिसेंबर रोजी तो त्या मुलीला त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला, जिथे सर्व आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या या प्रकरणाचा तपास एन एम जोशी पोलीस करत आहेत.

एन एम जोशी मार्ग पोलिसांनी आयपीसीच्या कलम 376 (डी) (2) (एन), 34 आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 4, 5, 6, 8, 10, 12, 17 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या आरोपींची अधिक चौकशी करत आहेत. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींपैकी तीन आरोपी प्रौढ आहेत. या आरोपींनी याआधीही अशाप्रकारचे कृत्य केले आहे, याचा तपासही पोलीस करत आहेत.सरम्यान तीन अल्पवयीन आरोपींची रवानगी डोंगरी भागातील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि अल्पवयीन मुलगी एकाच परिसरातील असून ते एकमेकांच्या ओळखीचे होते. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुंबई पोलिसांच्या वतीने सांगितण्यात आले आहे.


भारत जोडो यात्रा दिल्लीत दाखल, लाल किल्ल्यावर जाहीर सभा

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!