Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

औरंगाबाद : स्वयंपाक घरात आढळला मिठात पुरलेला सांगाडा

Spread the love

औरंगाबाद येथील वाळूज भागात तीन महिन्यांपासून बंद असलेल्या एका घराच्या स्वयंपाक घरात मिठात पुरलेला सांगाडा आढळला आहे. मृतदेह ज्या ठिकाणी पुरला होता त्या ठिकाणी शेंदूर लावलेले दोन दगड आढळल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. हा सांगाडा फॉरेन्सिक तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आला आहे.

वाळूजच्या समता कॉलनीत सूर्यकांत गोरखनाथ शेळके यांचे दोन मजली घर आहे. त्यांनी तळमजल्यावर सात रूम तर वरच्या मजल्यावर तीन रूम बांधल्या आहेत. सात महिन्यांपूर्वी शेळके यांनी काकासाहेब भुईगड यांना तळमजल्यावर दोन रूम भाडेत्वावर राहण्यासाठी दिल्या होत्या. भुईगड हे आपली पत्नी आणि दोन मुलींसह राहत होते. मात्र, तीन महिन्यांपूर्वी आपण नवरात्रीसाठी गावी जात असल्याचे सांगून भुईगड कुटुंबासोबत निघून गेले होते.

शेळके यांनी ते कधी येणार तसेच भाडे कधी देणार याबाबत भुईगड यांना अनेकदा फोन केले. मात्र, त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. त्यांनी त्यांच्या गावी देखील चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी त्या रूमचे कुलूप तोडले. दार उघडल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. घरात त्यांना सामान दिसले नाही. तसेच स्वयंपाक घरात ओट्याजवळ त्यांना खोदकाम केलेले दिसले. तसेच त्या ठिकाणी शेंदूर लावलेले दोन दगड आणि लिंबू ठेवलेले त्यांना दिसले. त्यानंतर त्यांना संशय आल्याने त्यांनी खोदकाम केले. त्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या पिशवीत मिठात गुंडाळलेल्या अवस्थेत असलेला मानवी सांगाडा त्यांना दिसला. त्यांनी याची माहिती तात्काळ वाळूज पोलिसांना दिली.हा सांगाडा महिलेचा आहे कि पुरुषाचा हे अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. दरम्यान, सांगाडा हा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

 

दोन लाख स्वस्त धान्य दुकानदारांना रस्त्यावर आणण्याचा भाजपचा प्रयत्न?


News Update on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!