Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HingoliNewsUpdate : हिंगोली जिल्हा नविन पोलिस अधीक्षक जी श्रीधर रूजू….

Spread the love

नूतन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या कार्यकाळात गुटखा, मटका अन्य अवैध धंदे बंद होतील हिंगोलीकरांची अपेक्षा…

हिंगोली / प्रभाकर नांगरे : आ हिंगोली जिल्हाचे नविन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिनांक २६ आकटोबर रोजी हिंगोली जिल्ह्याचा पदभार स्वीकारला . पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी नवीन पोलीस अधीक्षक ‌जी श्रीधर यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


जी श्रीधर हे तामिळनाडूतील कांचीपुरम या गावातील आहेत. यापूर्वी त्यांनी खामगाव, औरंगाबाद, नागपूर व बीड या ठिकाणी कर्तव्य बजावले आहे. बीड येथे कार्यरत असताना त्यांनी गुन्हेगारीला आळा घालून आपल्या कर्तव्याची जनतेत छाप सोडली होती.समोर गुन्हे तपासात त्यांच्या मार्गदर्शनाखाली बीड पोलीस राज्यात पाचव्या क्रमांकावर होते.त्याचबरोबर त्यांनी राज्यातील पहिल्या सखी सेलची स्थापना केली होती. पोलीस अधीक्षक म्हणून अकोला येथेही त्यांनी काम केले आहे.

कर्तव्य कठोर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांचा प्रवास राहिला आहे. आता त्यांची हिंगोली येथे बदली झाल्याने येथे सुद्धा त्याच पद्धतीने कार्य करतील अशी हिंगोली करांना अशा असून हिंगोली जिल्ह्यातील गुटखा मटका व अन्य अवैध धंदे यासी आळा घालतील अशी देखील हिंगोली करांची अपेक्षा वाढली आहे. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणल्याचे नक्कीच दिसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!