#LiveUpdates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Live update
28. Oct. 2022 – Friday
केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी.
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
#MahanayakOnline | #NewsUpdate
-
राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात होणार असल्याचं वृत्त तथ्यहीन असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.
-
पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात
– औरंगाबाद: पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर
– पुणे: पेट्रोल 105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
– कोल्हापूर: पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
-
चीनमध्ये सलग तीन दिवसांपासून १ हजारहून अधिक करोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिथे करोनाचा उगम झाला त्या वुहान शहरापासून उत्तर पश्चिमेकडील अनेक शहरात करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा वुहानमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या परिसरातील इमारती सील करण्यात आल्या आहेत.
-
भाज्यांचे भाव वाढले, परतीच्या पावसाचा मोठा फटका; मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक मध्ये भाज्यांच्या भावात २५ ते ३० टक्के वाढ
-
ज्येष्ठ लेखिका मृणालिनी जोशी यांचे निधन
-
समृद्धी महामार्गाचे लवकरच लोकार्पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
-
महाराष्ट्रातला 22 हजार कोटींचा आणखी एक उद्योग गुजरातमध्ये, सी-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बडोद्यात होणार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते 30 ऑक्टोबरला कोनशिलेचं उद्घाटन
-
चार दिवसीय छठ उत्सव आजपासून सुरू होणार आहे.
गल्ली ते दिल्ली दौरा…
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज सकाळी 10.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिविराला संबोधित करणार
-
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे महाबळेश्वरात असणार आहे. ते आज महाबळेश्वरमध्ये मुक्काम करणार असून संध्याकाळी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
-
राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Savant ) हे आजअहमदनगर दौऱ्यावर आहेत. चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक येथे ते अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ते भाजप नेते राम शिंदे यांच्या घरी सदिच्छा भेट देणार आहेत.
-
राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे आज धुळ्यात येत असून त्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर प्रथमच ही बैठक होणार आहे. यामुळे अनेक विषयांच्या कारणावरून ही बैठक वादळी होण्याची शक्यता आहे.