Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CongressNewsUpdate : ग्लोबल हंगर इंडेक्स-२०२२ वरून राहुल गांधी यांची सरकारवर टीका

Spread the love

नवी दिल्ली : सध्या देशभरात ग्लोबल हंगर इंडेक्स-२०२२ च्या प्रसिद्ध झालेल्या अहवालाची चर्चा चालू असून विरोधकांकडून यावर टीका होतआहे . या अहवालानुसार १२१ देशांपैकी भारत १०७ व्या क्रमांकावर भारत आहे. यावरूनच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसला लक्ष केले आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करून लिहिले की, “भूक आणि कुपोषणात भारत १२१देशांपैकी १०७ व्या क्रमांकावर आहे. आता पंतप्रधान आणि त्यांचे मंत्री म्हणतील की भारतात उपासमारी वाढत नसून इतर देशांमध्ये लोकांना भूकच लागत नाही.”


राहुल गांधी यांनी पुढे लिहिले आहे की, “आरएसएस-भाजप किती दिवस जनतेची दिशाभूल करून भारताला कमकुवत करण्याचे काम जाणार आहेत?” राहुल गांधींसोबतच पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, पी. चिदंबरम आणि इतर काँग्रेस नेत्यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, ”मोदीजी, दुसरे काही निमित्त उरले आहे का?” ”उपासमारी निर्देशांकात भारत पुन्हा खाली घसरला आहे. भाजप वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न करत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.”

भारताची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न

दरम्यान मोदी सरकारने हा अहवाल फेटाळला आहे. शनिवारी केंद्र सरकारने सांगितले की, हा अहवाल ग्राउंड रिअॅलिटीपेक्षा वेगळा आहे. तसेच कोरोना महामारीच्या काळात सरकारने केलेल्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. या माध्यमातून भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. तसेच दरवर्षी खोटी माहिती देणे हे ग्लोबल हंगर इंडेक्सचे वैशिष्ट्य असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!