Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CongressNewsUpdate : काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान, मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात होते आहे लढत…

Spread the love

नवी दिल्ली :  काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज सोमवारी मतदान आहे. त्यासाठी देशभरातील ४० केंद्रांवर ६८ बूथ तयार करण्यात आले आहेत. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून राज्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडेल.


काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर  यांच्यात लढत होत असून सुमारे ९८००  मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. सोनिया गांधी, मनमोहन सिंग, प्रियंका गांधी यांच्यासह सीडब्ल्यूसीचे सदस्य काँग्रेस मुख्यालयातील बूथवर मतदान करतील.  राज्यात ५६१ प्रदेश प्रतिनिधी मतदान प्रक्रियेत सहभागी होतील. या निवडणुकीसाठीचे प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश कुमार, नरेंद्र रावत, कृष्णा पुनिया हे मतपेट्या घेऊन मुंबईत आले आहेत.

दरम्यान या निवडणुकीत भारत जोडो यात्रेच्या शिबिरात एक बूथ तयार करण्यात आला असून तेथे राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेत सहभागी असलेले ४० मतदार मतदान करणार आहेत. मल्लिकार्जुन खरगे बेंगळुरू येथील प्रदेश काँग्रेस कार्यालयात तर  शशी थरूर तिरुअनंतपुरममध्ये मतदान करणार आहेत. मतदानानंतर मतपेट्या दिल्लीत आणल्या जातील, जिथे पक्षाच्या मुख्यालयात १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल आणि निकाल घोषित केले जातील. काँग्रेस अध्यक्षपदासाठी तब्बल २२ वर्षांनंतर निवडणूक होत असून तब्बल २४ वर्षांनंतर पक्षाची धुरा गांधी घराण्याबाहेर जाणार आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, काँग्रेसच्या 137 वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपदासाठी सहाव्यांदा अंतर्गत निवडणुका होत आहेत. ते पुढे म्हणाले की, माध्यमांनी १९३९, १९५०, १९९७ आणि २००या वर्षांची चर्चा केली आहे. परंतु १९७७ मध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठीही निवडणूक झाली होती. जेव्हा कासू ब्रह्मानंद रेड्डी निवडून आले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!