Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HingoliNewsUpdate : नांदेड परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धेत नांदेड सर्वप्रथम तर हिंगोली दुसऱ्या स्थानावर

Spread the love

हिंगोली / प्रभाकर नांगरे : २७ व्या नांदेड परिक्षेत्रीय पोलीस किडा स्पर्धेचे अयोजन हिंगोली जिल्हा पोलीस दलाकडुन करण्यात आले होते . स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दिमाखात पार पडला. या स्पर्धा दिनांक २० ते दिनांक २३ सप्टेंबर दरम्यान हिंगोली शहरातील संत नामदेव पोलीस कवायत मैदान , नवीन पोलीस वसाहत मैदान , रा . रा.पो.ब. गट क व १२ चे मैदान , जिल्हा किडा संकुल हिंगोली , जलतरणीचा महानगर पालीका नांदेड येथे सर्व सुविधायुक्त साहीत्य व प्रशिक्षीत / तज्ञ पंचाच्या उपस्थितीत घेण्यात आल्या .


सदर स्पर्धेत १ ) हिंगोली २ ) नांदेड , ३ ) लातुर , ४ ) परभणी या ०४ जिल्हयातील जवळपास ५१२ पोलीस अधिकारी व अंमलदार ( पुरूष व महिला ) खेळाडु सहभागी झाले होते . सदर परीक्षेत्रीय क्रिडा स्पर्धेत वयक्तीक , ॲथेलेटिक्स मधील सर्व स्पर्धा , जलतरण स्पर्धा व सांघीक मधील कब्बडी , खो – खो , व्हॉलीबॉल , बास्केटबॉल , फुटबॉल , हॉकी , इ . सर्व स्पर्धा घेण्यात आल्या चारही जिल्हयातील खेळाडुंनी अतिशय उत्साहात व खेळ भावनेने सदर स्पर्धेत सहभाग घेवुन आपले कौशल्य दाखविले .

सदर २७ व्या नांदेड परीक्षेत्रीय क्रिडा स्पर्धेचा समारोप समारंभ संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर दिमाखात पार पडला सदर कार्यक्रमास निसार तांबोली, पोलीस उप महानिरीक्षक नांदेड परीक्षेत्र , नांदेड , जितेंद्र पापळकर , जिल्हाधिकारी हिंगोली , संजय देने , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद हिंगोली, एम . राकेश कलासागर , पोलीस अधीक्षक हिंगोली , प्रमोद शेवाळे , पोलीस अधीक्षक नांदेड , निखील पिंगळे , पोलीस अधीक्षक लातुर , जयंत मिना , पोलीस अधीक्षक परभणी , संदिपसिंह गिल , समादेशक रा.रा.पो.ब.गट.क. १२ हिंगोली , यशवंत काळे , अपर पोलीस अधीक्षक हिंगोली , मुमक्का सुदर्शन , अपर पोलीस अधीक्षक परभणी , श्री यतीश देशमुख , सहा . पोलीस अधीक्षक हिंगोली , श्री . संजय मुंढे , जिल्हा किडा अधिकारी हिंगोली यांची प्रमुख उपस्थिती होती .

सर्व क्रीडा प्रकारात नांदेडचा संघ आघाडीवर

समारोप कार्यक्रमात सुरूवातीला मान्यवरांना मानवंदना दिल्यानंतर पुरूष व महीला खेळाडुंचे १०० मीटर धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या . त्यानंतर निमंत्रीत नागरीक व पोलीस अधीकारी यांचेत रस्सीखेत्र स्पर्धा संपन्न झाली . त्यांनतर चारही जिल्हयातील खेळाडुंचे परेड मार्च व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडुंना प्रशस्तीपत्र , मेडल्स व वेगवेगळया प्रकारचे वस्तु बक्षीस देण्यात आल्या . २७ व्या परीक्षेत्रीय किडा स्पर्धेत सर्वाधिक क्रीडा प्रकारात पुरस्कार जिंकून नांदेड जिल्हयाने स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद प्रथम क्रमांक मिळविले तर हिंगोली जिल्ह्याने सदर स्पर्धेत दुस – या क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद पुरस्कार जिंकलेले आहेत .

सदर परीक्षेत्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये बेस्ट अॅथलेट ( पुरूष ) चे मानकरी पोलीस अंमलदार / ७८० सहदेव जाधव , हिंगोली तर बेस्ट अॅथलेट ( महीला ) पोलीस अंमलदार १ ) शिल्पा राठोड ब.नं. २७३६ व २ ) पुजा नवले , ब.नं. २५० ९ दोन्ही नांदेड जिल्हा यांनी मिळविले असुन बेस्ट अॅथलेट यांना ” रेसिंग सायकल ” बक्षीस म्हणुन भेट देण्यात आले . सदर समारंभ कार्यक्रमात निसार तांबोली , पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परीक्षेत्र , नांदेड , जितेंद्र पापळकर , जिल्हाधिकारी हिंगोली संजय दैने , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद हिंगोली , राकेश कलासागर पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ . विजयकुमार निलावार यांनी केले तर आभार प्रदर्शन अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी केले .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!