Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CyrusMistryAccident : सायरस मिस्त्री यांच्या अपघाताचे कारण आले समोर , या चुकीमुळे गेला जीव …

Spread the love

मुंबई : जीवन अनमोल आहे हे लक्षात घेऊन प्रत्यक्ष जीवन जगताना थोडीही लपरवाही झाली तर व्यक्ती जीवाला मुकू शकतो याची प्रचिती अनेकवेळा आलेली आहे. खास करून आजपर्यंत जे अपघात होतात त्यातील बहुसंख्य अपघात संबंधित चालकाच्या बेपर्वाईमुळे झालेले आपणास दिसून येतात तरीही लोक काळजी घेताना दिसत नाहीत.


गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसंग्रामचे नेते माजी आमदार विनायक मेटे यांचा अपघातही चालकाच्या चुकीमुळे झाला असे दिसून आले आहे . तसेच ‘टाटा सन्स’चे माजी अध्यक्ष उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघातहीअशाच चुकीमुळे झाल्याचे संस्कृत दर्शनी निदर्शनास आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. एक तर वाहनांची गती , चालकाचे सुटलेले नियंत्रण आणि सायरस मिस्त्री यांच्यासह त्याच्या सोबत असलेल्या प्रवाशांनी सीटबेल्ट न बांधणे हे या अपघाताला मुख्य कारण आहे. प्रत्यक्ष वर्षीच्या म्हणण्यानुसार कार प्रचंड वेगात होती आणि ती इतर वाहनांना ओव्हरटेक करीत निघाली होती.

रविवारी दुपारी डहाणूजवळील चारोटी जवळ झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री आणि जहांगीर दिनशा पंडोल या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर कार चालक डॉ. अनायता पंडोल आणि दरीयस पंडोल हे गंभीर जखमी झाले. या अपघाताच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायरस मिस्त्री हे पंडोल कुटुंबियांसह अहमदाबादहून मुंबईकडे मर्सिडीज कारने येत होते. चारोटी नाक्याजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला त्यांच्या भरधाव कारची धडक बसल्याने  हा भीषण अपघात झाला. कार पुलाच्या कठड्याला धडकताच मोटारीतील संरक्षक ‘एअर बॅग’ उघडल्या, मात्र मिस्त्री आणि जहांगीर आसनावरून फेकले गेल्याने यांचे संरक्षण होऊ शकले नाही, असे सांगण्यात आले आहे. मागील सीटवर बसल्यानंतर सीट बेल्ट न बांधण्याची चूक सायरस आणि त्यांच्यासोबतच्या प्रवाशाच्या जीवावर बेतली. पुढच्या आसनावरील दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वापीला हलवण्यात आले.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ….

सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूचं डॉक्टरांनी कारण सांगितलं आहे. डॉक्टर शुभम सिंह यांनी सांगितले की, सायरस मिस्त्रींच्या डोक्यावर मार बसला होता. मृत्यूचं कारणही तेच असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तसेच अपघात होताच त्यांचा जागीच मृत्यू झाला. जहांगीर पंडोल यांचाही घटनास्थळी मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दोघांना जेव्हा रुग्णालयात घेऊन आले, तेव्हा दोघांचाही मृत्यू झाला होता.

एक तरुण उद्योजक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायरस यांच्याकडे २०१८ मध्ये  ७०,९५७ कोटी रुपये इतक्या किमतीची संपत्ती होती. ते पत्नी रोहिका छागला यांच्यासोबत मुंबईतील एका आलिशान घरात राहत होते. मुंबईसह आयर्लंड, लंडन आणि दुबईमध्येही त्यांचे निवासस्थान आहे. सायरस इतके श्रीमंत असले तरी त्यांच्या साधेपणामुळे ते ओळखले जात होते.

अनेकांची श्रद्धांजली

सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच देशभरातील राजकीय व्यक्ती, उद्योगपती, सहकारी, मित्र यांना धक्का बसला. उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विविध केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदींनी मिस्त्री यांच्या अपघाती निधनाबद्दल दुःख व्यक्त करत शोकसंवेदना व्यक्त केल्या.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!