Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

EknathShindeNewsUpdate : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या …

Spread the love

मुंबई : आधी राज्याच्या विधान मंडळातील गट नेता , प्रतोद बदलणे आणि नंतर शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बदलून संसदेतील गट नेता आणि प्रतोदची नियुक्ती करणे आणि आता थेट शिवसेना पदाधिकाऱ्यांची निवड करणे असा कृती आराखडा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतला आहे .

याचाच एक भाग म्हणून शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या नवीन पदांची नियुक्ती जाहीर करून नव्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी नियुक्तीपत्रेही स्वतःच्या हस्ते प्रदान केली आहेत. या निर्णयानुसार शिवसेनेच्या सचिवपदी कामगार नेते किरण पावसकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांची शिंदे यांनी सचिव पदावर नियुक्ती केली आहे. तर आधी जाहीर करण्यात आल्याप्रमाणे आमदार दिपक केसरकर हेच पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती कायम राहणार आहे.

दरम्यान  शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील, शिवसेना उपनेते आणि आमदार उदय सामंत, किरण पावसकर, आमदार गुलाबराव पाटील आणि दहिसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेली आहे. तर अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची पक्षाच्या खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

चर्चेतले एकनाथ शिंदे

आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून शुभेच्छा दिल्या खऱ्या पण यामध्ये उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शिंदे यांनी पक्ष प्रमुख असा करण्याऐवजी माजी मुख्यमंत्री असा केला होता त्यामुळे त्यांच्या या ट्विटची आज माध्यमात दिवसभर चर्चा होती.

याशिवाय त्यांनी आज दिवसभरात ज्या कार्यक्रमांना हजेरी लावली त्याबद्दलचे  इतर ट्विटही  केले आहेत. यामध्ये अंबरनाथ उप शहरप्रमुख ह.भ.प. पुरुषोत्तम उगले यांच्या पुढाकाराने अंबरनाथ तसेच बदलापूर परिसरातील वारकरी संप्रदायातील अनेक नागरिकांनी नुकतीच माझी भेट घेऊन युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केल्याचे म्हटले आहे.

याशिवाय शिवसेना नेते रामदास कदम यांनाही त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!