Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : शरद पवारांना महाराष्ट्रात आदराचे स्थान , केतकीच्या वक्तव्याचा सुजात आंबेडकरांनी घेतला समाचार

Spread the love

ठाणे : महाराष्ट्राच्या राजकारणात ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांना आदराचे स्थान आहे. जगभरातील कॅन्सरच्या रुग्णांसाठी शरद पवार हे एक प्रेरणा आहेत. कॅन्सरवर मात करून ते या वयातही इतके  बोलतात, लोकांना भेटतात, भाषणे करतात. अशा नेत्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाची भाषा वापरणे अयोग्य असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दिली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर फेसबुकवर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली असली तरी तिच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. यावर आपली तीव्र प्रतिक्रिया देताना सुजात आंबेडकर यांनी , म्हटले आहे कि अभिनेत्री केतकी चितळेने  फेसबुकवर टाकलेली पोस्ट अतिशय घाणेरडी आणि चुकीची होती. सुजत आंबेडकर काल कल्याणमध्ये “मूकनायक ते प्रबुद्ध भारत” या कार्यक्रमासाठी आले होते.

सुजात आंबेडकर पुढे म्हणाले की, “एखाद्याच्या व्यंगावर, दिसण्यावर टीका करु नका . शरद पवारांबद्दल महाराष्ट्रभरात आदर असून त्यांच्याबद्दल केलेले  वक्तव्य शोभनीय नव्हते . जगभरातल्या कॅन्सर पेशंट्ससाठी शरद पवार हे प्रेरणादायी आहेत. कारण कॅन्सरवर मात करून ते या वयातही इतके  बोलतात, लोकांना भेटतात, भाषणे  करतात, त्यामुळं त्या नेत्याबद्दल असे  बोलणं चुकीचे  आहे,” असे  सुजात म्हणाले. केतकीने शरद पवारांवर टीका करताना त्यांचा चेहरा आणि बोलण्याच्या पद्धतीवरुन टीका केली होती.

दरम्यान सुजात यांनी प्रसारमाध्यमांना सल्ला देताना, “मीडियाने सध्या नेत्यांचे प्रश्न आणि उत्तरं, सभा सोडून महाराष्ट्रात टँकर विक्री किती वाढली आहे? यावर रिपोर्ट करावा,” असे  म्हटले आहे. सुजात यांनी यावेळी राजकारण्यांच्या भांडणात समाजाच्या प्रश्नांकडे माध्यमांचं दुर्लक्ष होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली.

केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी

केतकीला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने तिला अटक केली आहे. यानंतर आज ठाणे कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली. कोर्टात केतकीनं वकील घेतला नाही, तिनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. सकाळी केतकीला सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कस्टडीची आवश्यकता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. त्यानंतर ठाणे गुन्हे शाखेनं 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली होती .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!