Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत औरंगाबादच्या यश साठेची दिल्लीच्या अरिफ हुसेनवर मात

Spread the love

अहमदाबाद : गुजरात राज्यातील अहमदाबाद या शहरात 27 एप्रिल ते 1मे या कालावधीमध्ये 3 स्टार्स लेव्हलच्या राष्ट्रीय पातळीवरील स्क्वॉशमॅचेसचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मॅचेस मध्ये औरंगाबाद शहरातील खेळाडू यश प्रशांत साठे याने 27 एप्रिल रोजी दिल्लीचा खेळाडू आरिफ हुसेन याला 11-0,11-0,11-0 असा सरळ पराभव केला.

28 एप्रिल रोजी गुजरातचा नामांकित खेळाडू रोहन मानसिंगानिया याचा 11-6, 11-5,11-7 असा सरळ पराभव केला आहे.शुक्रवार २९ एप्रिल रोजी पश्चिम बंगालचा खेळाडू वंश सारोगी याचा 13-11,4-11,11-6,2-11,11-7 अशा पद्धतीने पराभव केला आहे. या तीन मॅचेस मध्ये यश प्रशांत साठे याने उत्तम कामगिरी केलेली आहे.

सेमी फायनल मॅचेस पर्यंत स्क्वॉश खेळामध्ये यश प्रशांत साठे हा मराठवाड्यातील पहिला खेळाडू आहे.SRFi च्या मॅचेस एशियन ज्युनिअर चॅम्पियनशिप साठी, एशियन गेम आणि कॉमनवेल्थ साठी स्क्वॉश खेळाडू घडविण्याचे कार्य करत आलेली आहे. SRFi या असोसिएशनच्या मॅचेस व्यवसायिक स्क्वॉश खेळाडू साठी देखील असतात. या मॅचेस मध्ये विजय होणे ही अत्यंत मोठी गोष्ट मानली जाते.

मराठवाडा भागातून या मॅचेस मध्ये सेमी फायनल अर्थात टॉप फोर मध्ये खेळणारा यश साठे हा पहिला खेळाडू आहे. स्क्वॉश कोच किशोर हिवराळे, होली क्रॉस इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर सिंथिया आणि क्रीडा शिक्षक प्रफुल निर्मळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!