AurangabadNewsUpdate : दौलताबाद पोलिसांचा उपक्रम , हळदी कुंकवासोबंत आरोग्य तपासणी

औरंगाबाद -वीटभट्टिवर काम करणाऱ्या मंजूर महिलांची मकर संक्रांतीचेऔचित्य साधून हळदी कुंकवा सोबत मोफत आरोग्य तपासणी घेण्यात आली. दौलताबाद पोलिस्टेश व लायन्स क्लब औरंगाबाद रॉयल यांच्या संयुक्त विद्यमान मकर संक्रांत निमित्त दौलताबाद येथे वीट भट्टिवर काम महलांची मोफत आरोग्य तपासणी व महिलांना हल्दी कुंकु लावून वान म्हणून हत मौजे, सैनटाइझर, मास्क वाटप करण्यात आले आज पर्यंत वीट भट्टिवर काम करणाऱ्या महिलांची अश्या पद्धत्तिने आरोग्य तपासणी केली नव्हती सदर उपकर्माचे सर्वत्र कौतुक केले जात आहे
पोलिस निरीक्षक राजश्री आड़े यानी कामगार महिलांना हळद कुंकु लावून त्यांच्याशी संवाद साधला व काही समस्या असल्यास निसंकोच मांडण्याचे आव्हान केले जर कोणी त्रास देत असेल तर कधीही मला फोन करा असे आव्हान त्यानी केले. या वेळी पोलिस निरीक्षक राजश्री आड़े, लायन्स क्लब औरंगाबाद रॉयल अध्यक्ष गणेश जाधव, मनोज बोरा, पारस ओत्सवल, हर्षदी अग्रवाल, सचिन ओत्सवल,पोलिस कर्मचारी नीलेश पाटिल,परमेश्व पलोदे,भरतसिंग धुमाले,रमेश गिरी,महेश घुगे,शेख राजू आदी उपस्थित होते