Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीला अखेरचा निरोप , अनेक मान्यवरांची आदरांजली

Spread the love

नवी दिल्ली : तामिळनाडूमधील कुन्नरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेले भारताचे संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यावर दिल्लीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कृतिका आणि तारिणी या त्यांच्या मुलींनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी जनरल रावत यांच्या नातवांनीही अंत्यदर्शन घेत आदरांजली वाहिली. त्यांना १७ ‘गन फायर’ची सलामी देण्यात आली. यावेळी देशातील दिग्गज राजकीय नेत्यांसह भारतीय संरक्षण दलातील ८०० वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याशिवाय नेपाळ, भुतान, बांगलादेश, श्रीलंकाचे सैन्य दल प्रमुखांनी उपस्थिती लावली.

जनरल रावत आणि त्यांची पत्नी यांचे पार्थिव शुक्रवारी (१० डिसेंबर) सकाळी ११ वाजता त्यांच्या दिल्ली येथील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यानंतर त्यांचे नातेवाईक, मित्र, इतर सर्वांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजीत डोभाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांना आदरांजली वाहिली. याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खरगे, हरीश रावत, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि डीएमकेचे नेते ए. राजा आणि कनिमोई हे देखील या ठिकाणी उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!