Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : मोक्कातील तिसरा आरोपी जेरबंद, दौलताबाद पोलिसांची कारवाई

Spread the love

औरंगाबाद : माळीवाडा पेट्रोलपंप लूटणार्‍या तीघांपैकी एक फरार असलेला हर्षल बोरा रा.अहमदनगर यालाही काल रात्री दौलताबाद पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली आहे. या पूर्वी . नवप्रितसिंग तेरेसमसिंग उर्फ मनदीपसिंग सुरजितसिंग जाट (३६) रा. उमरापुरा अमृतसर , मोहित उर्फ मनी विजय शर्मा (३०) रा.प्रितनगर अमृतसर गुजराथ मधील विहारा पोलिसांकडून ८ नोव्हेंबर ला दौलताबाद पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी ताब्यात घेत कोर्टापुढे हजर केले. त्यांना १५नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.बोरा याने आरोपी नवप्रितसिंग जाट व मोहित शर्मा यांना बनावट आधारकार्ड तयार करुन दिले होते.

तीन महिन्यांपूर्वी दौलताबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माळीवाडा परिसरातील हर्ष पेट्रोलपंप लुटणार्‍या आरोपींवर मोक्काची कारवाई करण्यात आली होती. गुजराथ पोलिसांकडून रेकाॅर्डवरच्या दोघांना हर्ष पेट्रोलपंप लुटण्याच्या गून्ह्यात वर्ग करुन आणले होते व न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे पुन्हा गुजराथ पोलिसांच्या हवाली केले होते. आता मोक्काची कारवाई केल्यानंतर आरोपींना पुन्हा गुजराथ पोलिसांकडून आणले. महाराष्ट्रात वरील आरोपींवर राहता, धुळे, मनमाड शहरात गुन्हे दाखल आहेत. वरील कारवाई पोलिस उपायुक्त उज्वला वानकर सहाय्यक पोलिसआयुक्त विवेक सराफ,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजश्री आडे,पीएसआय दिलीप बचाटे यांनी पार पाडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!