Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : ट्रकच्या धडकेत सेवानिवृत् शिक्षकासह भाजी विक्रेता ठार

Spread the love

औरंगाबाद – सोमवारी संध्याकाळी ७.१५ च्या दरम्यान शहराकडे येणार्‍या दोन मोटरसायकलस्वारांना हायवा ने दिलेल्या धडकेत दोघे ठार झाले. या प्रकरणी हायवा चालकाविरुध्द छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कमलाकर ज्ञानेश्वर दैठणकर (६३) सरस्वती भुवन शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक व सुरेश पांडुरंग खंडागळे(५०)धंदा भाजी विक्रेता दोघेही रा.शिवशंकर काॅलनी वरील दोघे शहराकडे येत असतांना दौलताबादकडे भरधाव वेगाने जाणारा हायवा ने दोघांना जोरदार धडक दिली. दोन्ही जखमींना घाटीत उपचारासाठी पोलिसांनी दाखल केले असता डाॅक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी हायवा चालक फरार झाला असून पोलिसांनी हायवा व मोटरसायकल जप्त केल्या आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलिस करंत आहेत.

लूटारुंनी मारहाण करत लुबाडले, दोघे अटक

औरंगाबाद – रेकाॅर्डवरच्या गुन्हेगारांनी नशेत घरी जाणार्‍या नागरिकाला (रवि)काल रात्री १२च्या सुमारास लोखंडी राॅडने मारहाण करंत लूटले.या प्रकरणी आज संध्या ८वा.आरोपींना हर्सूल पोलिसांनी अटक केली आहे.

अमित अदमाणे(२१) व सागर शिंदे(२०) रा.जहाॅंगिर काॅलनी हर्सूल अशी अटक आरोपींची नावे आहेत. वरील दोघांनी अन्य साथीदारांना सोबंत घेत रविवारी मध्यरात्री श्रीकांत देशपांडे(३०) यांना राधास्वामी काॅलनी परिसरात लोखंडी राॅडने मारहाण करुन ५हजाराचा मोबाईल व ४हजार रु.रोख असा ऐवज लुबाडला. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक अमोल देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रफिक शेख करंत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!