Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNCBNewsUpdate : आर्यनला जामीन नाहीच , उच्च न्यायालयात जाण्याची तयारी

Spread the love

मुंबई : एनसीबीच्या अटकेत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन याचा जमीन विशेष न्यायालयाने नाकारला आहे. आर्यन सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. कॉर्डेलिया क्रूझ येथे छापा टाकल्यानंतर त्याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. १३ ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी केल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. दरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.व्ही.पाटील यांनी आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांचेही जामीन अर्जही फेटाळले आहेत.

बुधवारी एनसीबीने न्यायालयात ड्रग्ज विषयीचे आर्यनचे काही चॅट सादर केले आहेत. आर्यन खानच्या वकिलांनी मुंबई विशेष न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते आता उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार आहे असे म्हटले. काही काळासाठी आर्यनला आर्थर रोड जेलमध्ये आणखी काही दिवस तुरुंगात राहावे लागेल. सध्या तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्यन आणि मर्चंट मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आणि धामेचा भायखळा महिला कारागृहात आहेत. आरोपी आर्यन खान आणि इतरांविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (सी), २० (बी), २७, २८, २९ आणि ३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्यनच्या जामिनावर विशेष नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स कोर्टाने बुधवारी निकाल दिला. आर्यन सोबत, क्रूझमधून आणखी सात लोकांना अटक करण्यात आली. यानंतर या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली आहे. जामिनावर न्यायालयात गेल्या सुनावणी दरम्यान, एनसीबीने म्हटले की, आर्यन खान गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे ड्रग्ज घेत होता असे पुरावे दर्शवतात. दरम्यान आर्यनच्या ताब्यातून काहीही सापडले नसले तरी त्याच्या चॅटमधून त्याचा आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटशी संबंध असल्याचे उघड होत आहे. याबाबतचे पुरावेही एनसीबीने न्यायालयात दिले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!