AurangabadNewsUpdate : “तो ” पेट्रोलपंप लुटणाऱ्या आरोपींवर मोक्का, गुजराथ पोलिसांकडून पुन्हा घेणार ताब्यात

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – दोन महिन्यांपूर्वी दौलताबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माळीवाडा परिसरातील हर्ष पेट्रोलपंप लुटणार्‍या आरोपींवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. नवप्रितसिंग तेरेसमसिंग उर्फ मनदीपसिंग सुरजितसिंग जाट(३६) रा. उमरापुरा अमृतसर ,मोहित उर्फ मनी विजय शर्मा(३०) रा.प्रितनगर अमृतसर या दोन अटकेतील व एक फरार असलेला दिलीप बोरा रा.अहमदनगर अशी मोक्का ची कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Advertisements

हे दोन्ही आरोपींना दोन आठवड्यांपूर्वी गुजराथ मधील विहारा पोलिसांनी अटक केल्यानंतर दौलताबाद पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी त्यांना हर्ष पेट्रोलपंप लुटण्याच्या गून्ह्यात वर्ग करुन आणले होते व न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे पुन्हा गुजराथ पोलिसांच्या हवाली केले होते.

Advertisements
Advertisements

आता मोक्काची कारवाई केल्यानंतर आरोपींना पुन्हा गुजराथ पोलिसांकडून आणावे लागणार आहे. महाराष्ट्रात वरील आरोपींवर राहता, धुळे, मनमाड शहरात गुन्हे दाखल आहेत.
वरील कारवाई पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, उज्वला वानकर, सहाय्यक पोलिस आयुक्त विवेक सराफ, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, सहाय्यक पोलिस निरीक्षक द्वारकादास भांगे यांनी केली आहे.

आपलं सरकार