MumbaiNewsUpdate : एनसीबीकडून कॉर्डेलिया क्रूझवर पुन्हा सरप्राईज छापा !!

मुंबई : मुंबईत एनसीबीने मुंबई – गोवा दरम्यान जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवर धाड टाकून रेव्ह पार्टी उधळून ८ जणांना अटक केल्याचे प्रकरण शाहरुख खानचा मुलगा आर्यनमुळे गाजत असताना आज पुन्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने याच जहाजावर पुन्हा सरप्राईज तपासणी करीत छापा टाकला असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी स्वतः ही धाड टाकली आहे.
दरम्यान या धाडीतही काही प्रमाणात अंमली पदार्थ सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या कारवाईत आणखी काही ड्रग पेडलर्संनाही ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईतून पुन्हा एकदा बॉलिवूड आणि ड्रग्जचे कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले.
एनसीबीला तीन दिवसांपूर्वीच याबाबतची माहिती मिळाली होती. कोड वर्ड वापरुन ही पार्टी आयोजित केली होती. आरटीपीसीआर असा हा कोड असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एनसीबीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्यांदाच एखाद्या क्रुझवर NCB च्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या क्रुझवर एक फॅशन शो सुरू होता. त्यामुळे अनेक श्रीमंत व्यक्ती आणि बॉलिवूडमधील सेलिब्रिटी या क्रुझवर हजर होते. एनसीबीने ही ड्रग्स पार्टी उधळून लावली. जवळपास १५०० लोक या क्रुझवर हजर असल्याची माहिती समोर आली आहे. यात दिल्लीतील मोठे व्यापारी सुद्धा सामील होते. अनेक लोकांकडे ड्रग्स आढळून आले आहे. एनसीबीचे पथक मागील २० दिवसांपासून या क्रुझवर नजर ठेवून होते.