Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

स्मृति मंधाना, पिंक बॉल कसोटीत शतक झळकावणारी पहिली भारतीय खेळाडू 

Spread the love

भारतीय महिला क्रिकेटर स्मृति मंधाना पिंक बॉल कसोटीत शतक झळकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघामध्ये सुरु असलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात भारताने दमदार सुरुवात केली. कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची स्थिती मजबूत आहे. भारताने आतापर्यंत पहिल्या डावात एक विकेट गमावत 158 धावा केल्या आहेत. यात स्मृतीच्या शतकाचा समावेश आहे. स्मृति मंधानाने सर्वोत्कृष्ट खेळी करत पहिल्या दिवसअखेर नाबाद 80 धावा पहिल्या दिवशी केल्या आहे.

पावसामुळे कालचा खेळ लवकर थांबवण्यात आला होता. पहिल्या दिवशी  एक विकेटच्या बदल्यात 132 धावा केल्या होत्या. भारताची सलामीवीर शफाली 64 चेंडूत 31 धावा केल्या. भारताची सलामीवीर स्मृति मंधाना आणि शफाली वर्माने 93 दमदार धावा केल्या. शफाली बाद झाल्यानंतर आलेल्या पूनम राऊत सोबत स्मृती मानधनाने भारताच्या डावाला आकार द्यायला सुरुवात केली. आतापर्यंत 55 षटकात भारताने स्मृती नाबाद 102 आणि पूनम राऊत 19 धावांवर खेळत आहे.

हा सामना क्विन्सलँडच्या करारा ओव्हल मैदानावर खेळवण्यात येत आहे. काल भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातल्या ऐतिहासिक डे-नाईट कसोटीला सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने आज नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. पण स्मृती आणि शफालीने ऑस्ट्रेलियन आक्रमणाचा नेटाने सामना केला. गुलाबी चेंडूवर खेळवण्यात येत असलेल्या या कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियन आक्रमणासमोर आश्वासक सुरुवात केली. खराब हवामानामुळे पहिल्या दिवशी अवघ्या 44.1 षटकांचा खेळ झाला. पण तोपर्यंत भारताने एक बाद 132 धावा धावफलकावर लावल्या होत्या. पहिल्या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा स्मृती 15 चौकार आणि एका षटकारासह 80 धावांवर तर पूनम राऊत 16 धावांवर खेळत होती.

दरम्यान महिला क्रिकेटच्या इतिहासात प्रकाशझोतात खेळवला जाणारा हा दुसराच कसोटी सामना आहे. तर भारतीय संघ पहिल्यांदाच गुलाबी चेंडूवर खेळत आहे. याआधीव ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात 9 ते 12 नोव्हेंबर 2017 साली पहिला डे-नाईट सामना खेळवण्यात आला होता. हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!