Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : कोरोनाबाधितांचा आलेख राज्यात होतो आहे कमी , सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट

Spread the love

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात २ हजार ८४४ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या २ हजार ४३२ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ३ हजार ०२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या २ हजार ८९५ इतकी होती. तर, आज ६० रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ३२ इतकी होती. आज राज्यात झालेल्या ६० रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ६५ हजार २७७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२६ टक्के इतके झाले आहे.

राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येबाबत दिलासादायक बातमी

आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३६ हजार ७९४ इतकी आहे. काल ही संख्या ३७ हजार ०३६ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ९ हजार २६३ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या ६ हजार ००१ आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ५ हजार ५३१ अशी वाढली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या २ हजार ०७७ वर आहे. तर, सांगलीत एकूण १ हजार २७२ आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या १ हजार ५७६ इतकी आहे.

मुंबईत सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५,०६३ असून मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ५ हजार ०६३ इतकी आहे. तर, रत्नागिरीत ६९८ इतकी आहे आहे, सिंधुदुर्गात ६६२, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८१७ इतकी खाली आली आहे. याशिवाय धुळे, भंडारा जिल्ह्यात प्रत्येकी २ सक्रिय रुग्ण असून औरंगाबादमध्ये ३३०, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ११५ इतकी वाढली आहे. अमरावतीत ही संख्या १०८ वर आली आहे. तर धुळे आणि भंडाऱ्यात सर्वात कमी, प्रत्येकी २ सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ८४ लाख २९ हजार ८०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ४४ हजार ६०६ (११.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ५४ हजार ९८५ व्यक्ती २,५४,९८५ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत. तर, १ हजार ५१४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

गडचिरोलीत वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या

दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र असून या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडून सभा, मिरवणूक, लग्न समारंभ आणि यात्रा उत्सव यांच्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात २८ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून १२ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१)(३) लागू करण्यात आले आहे.

दरम्यान या जिल्ह्यात ४ ऑक्टोबरपर्यंत मस्कऱ्या गणेशोत्सव सुरू असून घटस्थापना दिनांक ७ ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. काही राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक उत्सव, सभा, मिरवणूक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसंच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाने जमावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!