CoronaMaharashtraUpdate : जाणून घ्या राज्यातील कोरोनाची आजची स्थिती

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कालच्या तुलनेत आज कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत देखील घट झाली असून कोरोना बाधित मृतांच्या सख्येतही घट झाली आहे. दरम्यान राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील घटल्याने दिलासादायक स्थिती असल्याचे चित्र आहे. गेल्या २४ तासात राज्यात २ हजार ४३२ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार २०६ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण २ हजार ८९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ३ हजार २९२ इतकी होती. तर, आज ३२ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ३६ इतकी होती.

Advertisements

आज राज्यात झालेल्या ३२ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ६२ हजार २४८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२६ टक्के इतके झाले आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३७ हजार ०३६ इतकी आहे. काल ही संख्या ३७ हजार ८६० इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ९ हजार २४३ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या ५ हजार ८८८ आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ५ हजार ५०६ अशी वाढली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या २ हजार २०१ वर आहे. तर, सांगलीत एकूण १ हजार ३५७ आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या १ हजार ६९९ इतकी आहे.

आज घडीला मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या ५,०५३ असून ती रत्नागिरीत ६७४ इतकी आहे आहे, सिंधुदुर्गात ७२२, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८८६ इतकी खाली आली आहे. तर धुळे जिल्ह्यात एक सक्रिय रुग्ण असून या बरोबरच, औरंगाबादमध्ये २९३, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ११५ इतकी वाढली आहे. अमरावतीत ही संख्या १०० वर आली आहे. तर धुळे आणि भंडाऱ्यात सर्वात कमी, प्रत्येकी २ अशी सक्रिय रुग्णांची संख्या आहे.

राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ८२ लाख ८६ हजार ०३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ४१ हजार ७६२ (११.२२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ५७ हजार १४४ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. तर, १ हजार ५१७ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

आपलं सरकार