Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : अशी आहे राज्याची आजची कोरोनाची स्थिती

Spread the love

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिवसभरात ३ हजार २७६ नवीन रुग्णांची भर पडली असून ३ हजार ७२३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आता कमी होत असून दैनंदिन रुग्णसंख्या आता ३ हजारांपर्यंत खाली आली आहे. त्याचवेळी मृत्यूचे प्रमाणही कमी होत असून कोरोना रिकव्हरी रेट सध्या ९७.२४ टक्के इतका आहे. तर गेल्या २४ तासात आज आणखी ५८ करोना बाधित रुग्ण दगावले आहेत .

अहमदनगर जिल्ह्यासह काही भागांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठी असली तरी तितकीशी चिंता करण्याचे कारण नसल्याचे आरोग्य विभागाने नमूद केलेले आहे. दरम्यान संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन ऑक्सिजन साठ्याबाबतही उत्पादकांसाठी गाईडलाइन्स जारी करून सरकारने महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत. शाळा, मंदिरे, थीएटर्स उघडण्याबाबत निर्णय घेताना त्यासाठी ऑक्टोबर महिन्यातील तारखा सरकारने निश्चित केल्या आहेत. गणेशोत्सव नुकताच संपला असल्याने पुढचे काही दिवस स्थितीवर लक्ष ठेवून नंतरच सरकार निर्बंधांबाबत पुढची पावले टाकणार हे यामुळे स्पष्ट झाले आहे. मुंबई हायकोर्टातही सरकारकडून अशाप्रकारची माहिती देण्यात आली आहे.

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,४१,११९ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३८८३४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,७९,९२,०१० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,४१,११९ (११.२८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,५९,१२० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,४८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३७,९८४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्या राज्यात २,५९,१२० व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये तर १,४८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!