Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : लाल मुंग्यांची चटणी कोरोनावर उपाय ? सर्वोच्च न्यायालयाने दिले हे उत्तर …

Spread the love

नवी दिल्ली : कोरोनावर उपचारासाठी कोण कुठल्या औषधाचा वापर करेल सांगता येत नाही. योगगुरू रामदेव यांच्या कोरोनावरील औषधानेही देशात मोठी चर्चा सुरु झाली होती परंतु त्यांच्या आयुर्वेदिक औषधाला अधिकृत मान्यता न मिळाल्याने रामदेव यांनी ऍलोपॅथीच्या औषध उपचारावरच प्रश्न चिन्ह उपस्थित करून इंडियन मेडिकल कौन्सिलची नाराजी ओढवून घेताय होती आता तर कोरोनावार उपचार करण्यासाठी लाल मुंग्यांची चटणीचा वापर करण्याची परवानगी देण्यासाठी एका महाशयांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते परंतु सर्वोच्च न्यायालयाने हि याचिका फेटाळून लावली आहे.

यावर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे कि , संपूर्ण देशभरात कोरोनावरील उपचारासाठी अशा पारंपारिक उपचाराला परवानगी देता येणार नाही. सर्वोच्च न्ययालयाने म्हटले आहे कि , देशात कित्येक पारंपारिक उपचार आहेत. आपल्या घरातही अनेक पारंपारिक उपचार केले जातात. पण या उपचारांचा परिणाम स्वतःला भोगावा लागतो. मात्र संपूर्ण देशासाठी आम्ही अशा पारंपारिक उपचाराचा अवलंब कऱण्यास सांगू शकत नाही.

ओरिसातील आदिवासी समाजाचे नायधर पाढीयाल यांनी ही याचिका दाखल केली होती. प्रारंभी त्यांनी ओरिसाच्या उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. त्यावेळी लाल मुंग्यांच्या चटणीचा वापर कोरोनाच्या विषाणूला नष्ट करण्यासाठी केला जाऊ शकतो, असा दावा काही जण करत आहेत. हा दावा कितपत खरा आहे हे तपासण्यासाठी आयुष मंत्रालयाने संशोधन करावे, असा आदेश ओरिसाच्या उच्च न्यायालयाने देऊन सदर याचिका फेटाळून लावली होती. ओरिसा उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते परंतु सर्वोच्च न्ययालयानेही हि याचिका फेटाळली आहे. दरम्यान
या याचिकाकर्त्याला कोर्टाने कोरोना लस घेण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

याचिकाकर्त्यांच्या दावा असा आहे…

याचिकाकर्ते पाढीयाल यांच्या मते, लाल मुंग्यांच्या या चटणीमध्ये फॉर्मिक अॅसिड, प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी १२, झिंक आणि लोह असते. ही मुलद्रव्ये आपली रोगप्रतिकारक शक्तीत सुधारणा करतात. त्यांनी पुढे सांगितले की, ‘ओरिसा , पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांतील अनेक ठिकाणी लाल मुंग्यांचे सेवन केले जाते. तसेच याचा बर्‍याच रोगांवर उपचार म्हणून वापर केला जातो. ‘ पाढीयाल यांच्या मते, आदिवासी भागात कोरोनाचा संसर्ग कमी असण्यामागे हे देखील एक कारण असू शकते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!