EducationNewsUpdate : GoodNews : राज्यात शिक्षक भरतीची शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्याच्या शिक्षण विभागात एकूण २०६२ जागांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया होत असल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे कि , शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या एकूण अर्जांमधून ३९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आल्याची माहिती दिली आहे. शिक्षक भरतीच्या प्रक्रियेबाबतचे  एक ट्विट गायकवाड यांनी केले आहे.

Advertisements

“पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ५६१ खासगी व्यवस्थापनाच्या २०६१ रिक्त पदांसाठी १५१२३ पसंतीक्रमावर ३९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा!”, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये दिली आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान राज्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे २७ हजार आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे १३ हजार अशी एकूण ४० हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभागाकडून टप्प्याटप्याने या जागा भरल्या जाणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यात ६१०० जागा भरण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील पदभरतीचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ८ जुलै रोजी दिली होती.

आपलं सरकार