Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : आम्हाला युतीत कोणीही नको, स्वबळावर निवडणुका लढवणार : चंद्रकांत पाटील

Spread the love

मुंबई: ‘आम्हाला युतीत कोणीही नको, स्वबळावर निवडणुका लढवणार’ असे प्रतिपादन करीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांनी  थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात भाजप-शिवसेनेबाबत सकारात्मक वक्तव्य करणाऱ्या पाटील यांनी स्वबळाची भाषा करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. पाठीत खंजीर खुपसणारा चेहरा असे म्हटले की पूर्वी महाराष्ट्रात एकच चेहरा समोर यायचा, आता मात्र दुसरा चेहराही समोर येतो, तो कोणाचा?, उद्धव ठाकरेंचा अशा शब्दांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघाची हल्लाबोल केला.

कार्यकर्त्यांना संबोधित करताना चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना प्रश्न विचारले. त्यांनी विचारले की आतापर्यंत पाठीत खंजीर खुपसला असं म्हटलं तर एकच चेहरा समोर याचचा, तो कोणाचा?, त्यावर उपस्थितांनी शरद पवार असे उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी आता दुसरा चेहरा ही पाठीत खंजीर खुपसला असे म्हटले की समोर येतो, तो कोणाचा?, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर उपस्थितांपैकी काहींनी उद्धव ठाकरेंचा असे म्हटले. त्याला चंद्रकांत पाटील यांनी दुजोरा दिला.
यांचे नाव मोठे आणि लक्षण खोटे असे आहे. मोदी यांच्या जीवावर निवडून यायचे आणि त्यांच्यावरच टीका करायची असा यांचा कार्यक्रम असल्याचेही पाटील म्हणाले.

‘आम्हाला युतीत कोणीही नको, स्वबळावर निवडणुका लढवणार’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडताना काही दिवसांपूर्वी सकारात्मक भाष्य करणारे चंद्रकांत पाटील यांनी युतीविरोधात भाष्य केले आहे. आता आम्हाला युतीत कोणीही नको. आता भाजप आता स्वबळावर सर्व निवडणुका लढवेल आणि एकट्याच्या जीवावर सत्ता आणेल असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. युतीबाबत बोलत असताना मात्र त्यांनी भाजपला पाठिंबा देणाऱ्या पक्षांचा आवर्जून उल्लेख केला. आमच्यासोबत आरपीआय, रयत संघटना, शिवसंग्राम, राष्ट्रीय समाज पक्ष आणखी छोटे छोटे ग्रुप आहेत आणि असतील असे पाटील म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!