Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : अज्ञात पार्सलने सर्वांना लावले कामाला , त्यात निघाला तीन किलोचा चांदीचा रथ !!

Spread the love

औरंगाबाद : खामगावहून सिडको बसस्थानकावर बस पार्सल सेवेद्वारे पाठवलेले पार्सल ऑटो रिक्षामध्ये विसरले होते. पार्सलची रिक्षा गेल्यानंतर कुरिअरची कडून बसस्थानकावर उपस्थित पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. आज रविवारी घडलेल्या या घटनेची दखल घेत पोलिसांनी तत्काळ ऑटो रिक्षात राहिलेल्या पार्सलची शोधाशोध सुरु केली.

दरम्यान ऑटो रिक्षा चालकाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर संबंधित रिक्षाचालकाने क्रांती चौक पोलिस स्टेशन ला येत सहाय्यक फौजदार संदिपराव मोरे यांना घडलेली हकीकत सांगितली . त्यावर ऑटो रिक्षातील या विसरलेल्या बॅगच्या पार्सलमध्ये नेमके काय असावे याचा अंदाज येत नसल्याने पोलिसांनी लगेच बॉम्ब नाशक पथकाला पाचारण केले. या पथकाने बॅगची पाहणी केली असता , त्यामधे तीन किलो चांदीचे आसन व रथ असल्याचे निर्दशनास आले . दरम्यान पार्सल वरील नंबरवरून फोन करून पोलिसांनी सविस्तर माहिती घेतली आणि सर्व प्रकारचा उलगडा झाला.

सदर बॅगची पोलिसांना माहिती देणाऱ्या रिक्षा चालकाचे नाव परशुराम देविदास भंडारे , वय २८ , राहणार मुकुंदवाडी, संजयनगर असे आहे.या सर्व मोहिमेत ,यानंतर क्रांती चौक पोलिस स्टेशन डाॅ.गणपत दराडे यांचे सह सहायक फौजदार संदिपान मोरे यांना श्रीमती शेख यांच्यसह बॉम्बशोधक पथकाचे मोरे, सिडको एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक विठ्ठलराव पोटे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी सिडको बसस्थानक पोलीस चौकीचे पो.हेड.काॅ. दया ओहळ आदींनी परिश्रम घेत ,मुळ मालक,ते पार्सल डिलेव्हर सर्वाशी संपर्क साधून तीन किलो चांदी असलेला चांदीचा रथ शोधण्यात यशस्वी झाले.

या सर्व तपासानंतर प्रल्हाद भगवान चौधरी ,लालचंद मंगलदास सोनी,उदय हरिशेठ सोनी पीएनजी ज्वेलर्स , राधाकृष्ण कुरिअर औरंगाबाद सर्व संमतीने पोलीसांनी सर्व खात्री करून संबंधितांच्या स्वाधीन करण्यात आले. या सर्व प्रकरणात रिक्षाचकाच्या दक्षतेबद्दल कौतुक करण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!