WorldIndiaNewsUpdate : अफगाणिस्तानबाबत भारताचा मोठा निर्णय

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता भारतीय विमान सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. नियमित विमान उड्डाणामुळे क्रू आणि प्रवासी दोघांनाही धोका असण्याची शक्यता आहे, अशी भीती सूत्रांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेने आज काबूल एटीसी सोडले. त्यानंतर भारतातून आणखी काही विमानाचं उड्डाण करणे अवघड आहे. गुरुवारी शेवटच्या रेस्क्यूनंतर पुढील आदेश येईपर्यंत भारतीय उड्डाणे निलंबित राहतील.

Advertisements

या निर्णयाबाबत उच्चस्तरीय सूत्रांनी माध्यमांना सांगितले की, अद्याप कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र उड्डाणांवर खूप मोठा धोका आहे. आम्ही उड्डाणांच्या ऑपरेशनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरातील समुदायाच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. पुढे सुत्रांनी सांगितले की, जरी आम्हाला अफगाणिस्तानकडून पाठिंबा मिळाला, तरीही आमचा पाकिस्तानवर विश्वास नाही आहे. उच्चस्तरीय निर्णय घेतल्यानंतर धोरण तयार केले जाईल.

Advertisements
Advertisements

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशी शक्यता आहे की सरकार शेजारच्या देशांमध्ये उड्डाणे पाठवू शकते आणि लोकांनी तेथे यावे . त्यानंतर ज्यांच्याकडे वैध व्हिसा आहे, त्यांना भारतात आणले जाऊ शकते. त्यांनी सांगितले की, धोरणानुसार भारताचे मदतकार्य जवळपास संपले आहे.

आपलं सरकार