Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात ६ हजार ३८८ नवे रुग्ण , मृत्यूची संख्या चिंताजनक

Spread the love

मुंबई: राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ६ हजार ३८८ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.तर आज एकूण ८ हजार ३९० इतके रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासात २०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या १६३ इतकी होती.

दरम्यान आज राज्यात झालेल्या २०८ रुग्णांच्या मृत्यूंमुळे राज्याचा मृत्यूदर वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून २.०१ टक्क्यांवरच स्थिरावलेला दर आता २.११ टक्क्यांवर पोहोचला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख ७५ हजार ०१० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८६ टक्के इतके झाले आहे.

राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६२ हजार ३५१ इतकी आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १४ हजार ४२३ इतका आहे. त्या खालोखाल सांगलीत एकूण ७ हजार ०२७ इतके रुग्ण उपचार घेत आहेत. तर, साताऱ्यात ही संख्या ६ हजार ५७३ इतकी आहे. या खालोखाल अहमदनगरमध्ये एकूण ४ हजार ९६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात ६ हजार १३३ सक्रिय रुग्ण आहेत. तर सोलापुरात ४ हजार ५५३ इतके रुग्ण आहेत.

मुंबईत ३२०८ सक्रिय रुग्ण

मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून ही सख्या ३ हजार २०८ इतकी आहे. तर, रायगडमध्ये १ हजार ४७२, रत्नागिरीत १ हजार ७१२, सिंधुदुर्गात १ हजार ४१४, बीडमध्ये १ हजार ५९८, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८६७ इतकी आहे.

भंडाऱ्यात फक्त १ सक्रिय रुग्ण

या बरोबरच, औरंगाबादमध्ये ६२३, नांदेडमध्ये ही संख्या ६२ इतकी आहे. जळगावमध्ये ३२०,नागपूर जिल्ह्यात ही संख्या २७१ इतकी झाली आहे. तर यवतमाळमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १३ इतकी झाली आहे. तसेच अमरावतीत ही संख्या ६५ वर खाली आली आहे. नंदुरबारमध्ये ही संख्या ४ इतकी असून धुळ्यात ही संख्या ३ इतकी आहे. तर भंडाऱ्यात केवळ १ रुग्ण आहे. आज राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या भंडारा जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या १ वर आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!