Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra news update : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मोक्याच्या जागा मिळवाव्यात, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील : धनंजय मुंडे

Spread the love

मुंबई : ” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून प्रशिक्षणार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन मोक्याच्या जागा मिळवाव्यात. शासन प्रशिक्षणार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविण्यासाठी लागणारी सर्वोतोपरी मदत करण्यास कटिबद्ध आहे.” असे अभिवचन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

दरम्यान यावेळी मुंडे यांनी गेल्या वर्षभरापासून रखडलेला एम.पी.एस.सी. राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचा विद्यावेतनाचा प्रश्न मार्गी लावून कोवीड महामारीमुळे प्रशिक्षणार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढणेसाठी खास बाब म्हणून एम.पी.एस.सी. राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या ऑफलाईन बॅचला ४ महिन्यांची मुदतवाढ सुद्धा दिली.

एम.पी.एस.सी. राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांनी विद्यावेतन मिळण्यासाठी अनेक वेळा आंदोलने केली होती. प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून लॉकडाऊन कालावधीत घेतलेल्या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या विद्यावेतनाचा प्रश्न मार्गी लावला. याबद्दल संबोधी अकादमी, महाराष्ट्रचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्तीअंबीरे व प्रशिक्षणार्थी अर्जून बनसोडे, सुनील गायकवाड, दीपक पगारे, नागेश रणवीर, वाल्मिक वाघ, भूषण चोपडे यांनी मंत्री धनंजयजी मुंडे साहेबांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार केला.

यावेळी खाजगी सचिव डॉ. प्रशांतजी भांबरे यांनीही प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, “तुम्ही ग्रामीण भागातून इथे प्रशिक्षण घेण्यासाठी आलात. गरीब आई-वडिलांना तुमच्या कडून अनेक अपेक्षा असून हा तुमचा उमेदीचा काळ आहे. तुम्ही ठरवून अहोरात्र मेहनत केलीत तर यश तुमच्या पायावर लोळण घेईल. मला पुढचे वर्षी तुम्हाला उपजिल्हाधिकारी म्हणून पाहतांना अत्यानंद होईल. भूत काळातल्या सर्व बाबी विसरून आता नव्याने अभ्यासाला सुरवात करा आणि यशस्वी व्हा, अशा माझाकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.” या प्रसंगी गोपीनाथ कांबळे, रविकिरण पाटील, सुनील उकिरडे आदी अधिकारी उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!