Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : देशातील १८ जिल्ह्यांमध्ये वाढत आहे कोरोना…

Spread the love

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट अजून संपली नसल्याचे काल आरोग्यमंत्रालयाने सांगितले. देशात गेल्या २४ तासांत ४२,६२५ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ३६,६६८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत देशभरात एकूण ३,०९,३३,०२२ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात रिकव्हरी रेट ९७.३७ टक्के आहे. गेल्या २४ तासात ५६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील १८ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.

देशात सध्या करोनाची ४,१०,३५३ सक्रिय रुग्ण आहेत. देशभरात लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसीचे ४८.५२ कोटी डोस लोकांना देण्यात आले आहेत. गेल्या २४ तासांत लोकांना लसीचे ६२ लाख ५३ हजार ७४१ डोस देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी मंगळवारी सांगितले की, देशातील ५७ जिल्ह्यांमध्ये दररोज १०० रुग्ण आढळत आहेत. तसेच देशातील १८ जिल्ह्यांमध्ये करोनाची सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. यामध्ये केरळमधील १०, महाराष्ट्रातील ३, मणिपूरमधील २, अरुणाचल, मेघालय आणि मिझोरामच्या १-१ जिल्ह्यांचा समावेश आहे.

दरम्यान देशातील काही राज्यांमध्ये करोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. दुसऱ्या लाटेनंतर या प्रकरणातील तेजीमुळे केंद्र आणि राज्य सरकारची चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, देशभरात असे १८ जिल्हे आहेत, जिथे कोरोनाची नवीन प्रकरणे वाढत आहेत. यापैकी १० जिल्हे केवळ केरळमधील आहेत. तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा समावेश आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!