Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraMonsoonUpdate : मुंबईसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

Spread the love

मुंबई : मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात  गेल्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान या जोरदार पावसामुळे  मुंबईकरांची प्रचंड दैना झाली असून अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजही मुंबईसह अनेक जिल्ह्यात  मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, सोमवारीही मुंबईत अनेक भागात जोरदार  पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी आपली काळजी घेत घराबाहेर न पडण्याचे  आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले  आहे.


आयएमडीच्या इशाऱ्यानुसार  मुंबईत आजही मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे तर उपनगरे आणि कोकण भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.  याशिवाय  पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरातही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई बेहाल

आज तिसऱ्या दिवशीही मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले असून सेंट्रल मेन लाइन आणि हार्बर मार्गावरील गाड्यांवर मोठा  परिणाम होणार आहे. आयएमडीनुसार मुंबईत तीन तासांत २५० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस पडला जो रविवारी सकाळी ३०५ मिमीपर्यंत पोहोचला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर भारत हवामान खात्याने मुंबईला रेड अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान डॉपलर रडारकडून हवामान खात्याने घेतलेले फोटो फार भयानक आहेत. मुंबईवर सुमारे १८ किलोमीटर म्हणजेच ६० हजार फूट उंच ढग जमा झाले असल्याचं या फोटोंमधून समोर आले आहे. जे एव्हरेस्टच्या उंचीपेक्षा दुप्पट आहे. एव्हरेस्टची उंची सुमारे ९ किलोमीटर आहे. आयएमडीनुसार एका तासाच्या आत सुमारे दीडशे मिलिलीटर पाऊस पडला. असे म्हटले जाते की, महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यावर ढगांचा  एक जाड थर तयार झाला असून तो मुंबईकडे सरकला आहे.  हवामान तज्ज्ञ अक्षय देव्हरा यांनीही ट्विट करत या वादळाची उंची माऊंट  एव्हरेस्टच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे असं म्हटलं आहे.

मुंबईकरांच्या डोळ्यात अश्रू !!

मुंबईकरांसाठी रविवार हा फार धोक्याचा ठरला. कारण, चेंबूरमधील भिंत कोसळणे , विक्रोळी आणि भांडुप या ठिकाणी मुसळधार पावसामुळे भिंत आणि घर कोसळण्यासारख्या अपघातात आतापर्यंत तब्बल ३३ जणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चेंबूर आणि विक्रोळी इथं बचावकार्य संपले असून ३३ लोकांचा मृत्यू झाला आहे. चेंबूरमध्ये २१ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर विक्रोळीत १० लोकांचा मृत्यू झाला आहे. भांडुप येथे १ ठार झाल्याची बातमी आहे, तर वाशी नाकाइथेही एकाचा मृत्यू झाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!