Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : हिंदू-मुस्लीम एकता ही एक भ्रामक कल्पना , आम्ही मतांच्या राजकारणात भाग घेत नाही : मोहन भागवत

Spread the love

नवी दिल्ली : हिंदू-मुस्लीम एकता ही एक भ्रामक कल्पना आहे, कारण हिंदू-मुस्लीम वेगळे नाही तर एकच आहेत. सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे, तो कोणत्याही धर्माचा असो. पूजा करण्याच्या पद्धतीवरून लोकांमध्ये भेद करणं चुकीचं आहे. आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो. त्यामुळे इथे हिंदू आणि मुस्लिमांचं प्रभुत्व निर्माण होऊ शकत नाही. फक्त भारतीयांचं प्रभुत्व निर्माण होऊ शकतं. देशात एकतेशिवाय विकास शक्य नाही. राष्ट्रवाद हा एकतेचा आधार असला पाहीजे.”,  असे उद्गार  सरसंघचालक मोहन भागवत यांनी काढले आहेत.


भोहन भागवत गाजियाबादमध्ये राष्ट्रीय मुस्लिम मंचने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गेले होते.  या कार्यक्रमात डॉ. ख्वाजा इफ्तिखार अहमद यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं. डॉ. ख्वाजा अहमद यांनी वैचारिक समन्वय- एक पहल नावाचं पुस्तक लिहिलं आहे.

मॉब लिंचिंग प्रकार हिंदू धर्मविरोधी

यावेळी बोलताना भागवत पुढे म्हणाले कि , “जर कुणी व्यक्ती असं सांगत असेल की, इथे मुस्लिम राहु शकत नाहीत. तर तो व्यक्ती हिंदू नाही. गाय एक पवित्र प्राणी आहे. मात्र जे लोक गायीच्या नावाने दुसऱ्यांना मारत आहे. ते हिंदुत्व विरोधात जात आहेत. या लोकांवर कायद्याने पक्षपात न करता कारवाई केली पाहीजे. एखादी व्यक्तीवर गर्दीद्वारे हल्ला चढवणे म्हणजेच मॉब लिंचिंग प्रकार हिंदू धर्मविरोधी आहे. धर्माच्या नावाखाली मॉब लिंचिंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. एकतेशिवाय देशाची प्रगती शक्य नाही. ऐक्याचा आधार राष्ट्रवाद आणि पूर्वजांचा गौरव असावा. आपण लोकशाही देशात राहतो, यावर हिंदू किंवा मुस्लिम यांचे वर्चस्व असू शकत नाही. केवळ भारतीयच वर्चस्व गाजवू शकतात.

आम्ही मतांच्या राजकारणात भाग घेत नाही

आम्ही मतांच्या राजकारणात भाग घेत नाही. आमच्या देशात काय घडले पाहिजे याबद्दल काही कल्पना आहेत. आम्ही राष्ट्रीय हिताच्या बाजूने आहोत. हिंदू आणि मुस्लीम गेल्या ४० हजार वर्षांपासून एकत्र राहत आहेत. त्यामुळे धर्म कुठलाही असला तरी आपण भारतीय आहोत. त्यामुळे हिंदूंनी स्वतःची ओळख भारतीय म्हणून करून द्यावी, मोहन भागवत यांनी पुढे म्हटलं की, राजकारण लोकांना एकत्र करू शकत नाही. राजकारण लोकांना एकत्र करण्यासाठीचं शस्त्र बनू शकत नाही, परंतु ते ऐक्य बिघडवण्याचे हत्यार बनू शकतं.  असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

“आपण मागच्या ४० हजार वर्षांपासून एका पुर्वजांचे वंशज आहोत. भारतातील लोकांचा डीएनए एकच आहे. हिंदू-मुस्लिम असे दोन समूह नाही. एकत्र येण्यासारखं काहीच नाही. कारण आम्ही पहिल्यापासूनच एक आहोत. आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो. त्यामुळे इथे हिंदू आणि मुस्लिमांचं प्रभुत्व निर्माण होऊ शकत नाही. फक्त भारतीयांचं प्रभुत्व निर्माण होऊ शकतं. देशात एकतेशिवाय विकास शक्य नाही. राष्ट्रवाद हा एकतेचा आधार असला पाहीजे.”, असेही मोहन भागवत यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!